- आरोग्य

हे 10 पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम

आपल्या रोजच्या आहारात आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. मात्र आपल्या हे माहित आहे का? असे काही पदार्थ आहेत जे एकटेच खूप फायदेशीर आणि आरोग्यवर्धक असतात, परंतु जेव्हा तेच पदार्थ इतर कोणत्याही अन्नाबरोबर आपण घेतले तर तेव्हा ते फायद्याऐवजी आपल्या आरोग्यास हानी पोहोचवतात.

यालाच विरुध्द आहार असे म्हणतात. विरुद्ध आहार घेतल्याने बऱ्याचदा पोट बिघडते, एसिडीटी होते, उलट्या, जुलाब, मळमळ अशा गोष्टी होऊ शकतात. आपण किती प्रमाणात विरुद्ध आहार घेतलाय त्यावर हे परिणाम अवलंबून असतात. म्हणूनच आज आपण कोणते पदार्थ एकत्र खात असताना दक्षता बाळगावी हे जाणून घेणार आहोत.

आपण आपल्या आहारात मासे खात असाल तर त्यासोबत अथवा त्यानंतर दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. आपल्या आहारात उडीद डाळ खात असाल तर त्यासोबत अथवा त्यानंतर दही खाणे टाळा.

आपण आपल्या आहारात पालक आणि कांदा एकत्रित खाणे टाळा. आपण फणस किंवा तळलेले पदार्थ खात असाल तर दुधासोबत खाणे टाळा. चहा प्यायल्या नंतर थंड फळ खाणे, थंड पाणी पिणे टाळा.

टोमॅटो आणि काकडी एकत्रित करून खाल्ल्याने पोट फुगत, पोटात गॅस निर्माण होतात. त्यामुळे शक्यतो यांचे सेवन करणे टाळा. मांसाहार करत असाल तर त्यासोबत किंवा नंतर लगेच पनीर खाणे टाळा.

तुपासोबत थंड दुध घेणे टाळा. सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच सीताफळ खाणे टाळा. सकाळी सकाळी सीताफळ खाल्यास सर्दी, खोकला, घसा बसण्याचा त्रास होऊ शकतो.

तेल आणि तूप एकत्र करून वापरू नका. तेल आणि तूप वेगवेगळे खाल्ल्यास काहीच हरकत नाही. तेल आणि तूप एकत्रित विरुद्ध आहार असतो. आपल्याला विरुद्ध आहाराबद्दल ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *