- आरोग्य

शीतपित्त, अंगावर पित्त उठणे कारणे आणि घरगुती उपाय

आपल्याला बऱ्याच वेळा अंगावर शीतपित्त उठते. त्यामुळे अंगावर खाज सुटते. शीतपित्त उठल्यानंतर शरीरावर लाल पुरळ येतात. अंगाला खाज सुटते. एखाद्या पदार्थाची एलर्जी होऊन पित्त उठते.

शेंगदाणे, काजू, हरभरा डाळ अंडी, मासे, असे अनेक पदार्थ आहेत त्यामुळे अंगाला पित्त उठण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. अनेक औषधे खाऊन ही पित्ताचा त्रास कमी होत नाही. अशा वेळेस हे काही घरगुती उपाय केल्यास अंगावर उठलेले शीतपित्त कमी होईल.

सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे जे पदार्थ खाल्याने पित्त उठते ते पदार्थ खाणे टाळा. पित्त घालवण्यासाठी आमसूल/कोकम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि हे पाणी अंगावर  पित्त उठलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने पित्त कमी व्हायला मदत मिळते.

रोज आंघोळ करताना कोमट पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकून या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे अंगावर उठलेले पित्त कमी होते.

शीतपित्ताचा त्रास होत असल्यास अंगाला खाज येत असते. हि खाज थांबवण्यासाठी आपण ज्या भागावर आपल्याला खाज येते त्याठिकाणी नारळाचे तेल हलक्या हाताने लावा अथवा कापसावर तेल घेऊन लावा आणि राहूद्या. नारळाच्या तेलाने खाज कमी व्हायला मदत मिळते. अंगावर पित्त उठल्यास कांद्याचा रस सर्वागाला लावा कांद्याचा रस लावल्याने खाज नाहीशी होण्यास मदत मिळेल.

करंजाचे तेल अंगाला लावल्यामुळे अंगावर उठलेले पित्त निघून जाते. बाजारामध्ये करंजाचे तेल सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना पित्त उठण्याचा त्रास आहे. त्यांनी करंजाचे तेल लावा. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. पित्त उठून आलेली खाज कमी होते.

ज्यांना शरीरावर वारंवार पित्त येते त्यांनी आंघोळीच्या पाण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कधीकधी दूषित पाणी देखील खाज सुटण्याचे कारण असू शकते. आपण आंघोळ करत असलेले पाणी शुद्ध असल्याची खात्री करून घ्या. चांगल्या पाण्यानेच आंघोळ करा. आंघोळीच्या पाण्यात अॅन्टीसेप्टीक लिक्विड मिसळून त्या पाण्याने आंघोळ करा.

शीतपित्त उठल्यानंतर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच केळी, डाळिंब यांसारख्या फळांचा आहारामध्ये समावेश करा. तसेच रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास अंगावर पित्त उठत नाही.

शीतपित्त उठण्याचा त्रास होत असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे हळद. हळद ही अत्यंत गुणकारी आहे. एक कप दुधामध्ये हळद टाकून पिल्यास पित्त उठण्याचा त्रास कमी होतो. या समस्येवर हळद हा रामबाण उपाय आहे.

आपल्याला शीतपित्त, अंगावर पित्त उठणे कारणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *