- आरोग्य

सायटिका, सांधेदुखी, संधिवात, दमा, मुळव्याध यावर फार गुणकारी आहे या झाडाची पाने

पूर्वी घराच्या समोर तुळस, कडुलिंब, गुळवेल, यासोबतच पारिजताकाच झाड असायचं. सकाळी झोपेतून उठल्यावर घरासमोर या झाडाच्या फुलांचा सडा पडलेला आपण हि बघितले असेलच. ह्या फुलांचा येणारा मंद मंद सुगंध आपल्याला हि आवडला असेल!

आपल्या पूर्वजांना घराच्या समोर लावलेल्या या झाडांचे औषधी गुणधर्म माहित असायचे. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी ते या झाडांचा उपयोग करायचे. परंतु आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे, आपण गाव सोडून शहरात आल्यामुळे, घर लहान असल्याने आपल्या घराच्या आजूबाजूला अशी झाड आपल्याला बघायला मिळत नाही. आज आपण पारिजातकाच्या झाडाचे असणारे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

पोटात जंत असल्यास अशावेळी आपण पारिजातकाच्या झाडाची 2 ते 3 पाने बारीक करून त्याचा रस साधारणपणे 5 मिली त्यांना प्यायला दिल्यास पोटातील बाहेर पडतात.

डायबिटीज हा आजार असल्यास पारिजातकाच्या ताज्या पानाचा रस सकाळी रिकाम्यापोटी 10 मिली इतक्या प्रमाणात घेतल्यास रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होईल.

सायटिका, सांधेदुखी, संधिवात असा त्रास असल्यास 250 ग्राम पारिजातकाची पाने पाण्याने धुऊन हाताने त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्या नंतर एका पातेल्यात 1 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये हि पाने टाकून उकळून घ्या. पाणी अर्धे राहिल्यानंतर गॅस बंद करून पाणी थोडे गार होऊ द्या. सकाळी आणि संध्याकाळी एक कप ह्या प्रमाणात हा काढा आठ ते दहा दिवस घ्या. आपल्याला आराम वाटेल.

पारिजातकाच्या पानांचा काढा सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने दम्याचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. पारिजातकाच्या पानांचा काढा प्यायल्याने आपली पाचनशक्ती चांगली होते. पारिजातकाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ह्या पानांचा रस आपल्या त्वचेवर लावल्यास मुरूम कमी होतात. त्वचेला ग्लो येतो.

पारिजातकाच्या पानांचा काढा सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने ताप उतरायला मदत होते. कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा व्हायला मदत होईल.

पारिजातकाची पाने मूळव्याध या आजारासाठी एक चांगले औषध मानली जातात. या साठी पारिजातकाच्या पानाची पेस्ट बनवून त्या जागी लावल्याने त्रास कमी होतो.

आपल्याला पारिजातकाच्या झाडाचे असणारे औषधी गुणधर्म ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *