- आरोग्य

पुरुषांना लाल भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही नियमित आपल्यासाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती देत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत, लाल भोपळयाच्या बिया खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी मिळणारे फायदे.

लाल भोपळयाला हिंदी मध्ये कद्दू असे म्हणतात. याची शेती मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात केली जाते. लाल भोपळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फार हितकारक असते.

लाल भोपळयाच्या बियांमध्ये व्हिटामिन बी, मॅग्नेशियम तांबे, प्रथिने,झिंक असे विविध प्रकारचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. ज्याच्या मदतीने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते.

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. शरीरात झिंकची कमतरता असल्यास शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. आणि पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होते.

पुरुषांनी लाल भोपळ्याच्या बिया दुधासोबत खाल्ल्याने त्यांची प्रजनन क्षमता वाढायला मदत मिळते. यासोबतच प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. नियमित लाल भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता दूर होते. रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत मिळते. लाल भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने डायबेटीज नियंत्रणात राहायला मदत होते.

आपल्याला लाल भोपळयाच्या बिया खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी मिळणारे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *