- आरोग्य

सकाळच्या नाश्त्यामध्ये करा ह्या पदार्थाचा समावेश “हाडे होतील मजबूत”

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव म्हणून आम्ही आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेला पदार्थ बदाम आणि काजू पेक्षा स्वस्त असून सुद्धा त्यांच्या इतकेच पोषण मुल्य असणारा आहे.

आज आपण ज्या पदार्थ बद्दल जाणून घेणार आहोत त्याच नाव आहे शेंगदाणे यालाच हिंदीमध्ये मुंगफली अस म्हणतात. शेंगदाणे खायला आपल्या सगळ्यांनाच आवडत. प्रवासात अनेकदा आपण टाईमपास म्हणून खारे शेंगदाणे खातो.

शेंगदाणे खाताना आपण हा विचार हि केला नसेल कि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या फायदे मिळू शकतात. शेंगदाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम आणि झिंक असे पोषक घटक असतात. चला तर जाणून घेऊयात सकाळच्या वेळी आपल्या नाश्त्यामध्ये शेंगदाण्यांचा कशा प्रकारे समावेश करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यामधून दुप्पट फायदे  मिळतील.

सकाळच्या नाश्त्याच्या ऐवजी आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा पर्यायी नाश्ता आपण करू शकता. यासाठी लहानशी वाटी भरून भिजवलेले किंवा कोरडे शेंगदाणे घ्या. आणि एक लहानश्या गुळाच्या खड्यासोबत हे खा.

आपण नियमितपणे आठवड्यातून 2 वेळा हा नाश्ता केला तर आपली पचनशक्ती चांगली होईल. गर्भवती स्त्रियांनी याचे सेवन केले तर त्यांच्या बाळाच्या विकास चांगल्याप्रकारे होईल. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे आपल्याला असणारे पोटाचे आजार कमी होतील.

गॅस आणि ऍसिडिटीपासून आराम मिळेल. आपली त्वचा चांगली होईल. आपल्याला रक्ताची कमतरता भासणार नाही. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. शेंगदाण्यात असणाऱ्या कॅल्शियम घटकांमुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतील. पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहील.

आपल्याला शेंगदाणे खाल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *