- आरोग्य

8 दिवस ओव्याची पाने खाल्याने हे 5 आजार होतील कायमचे दूर

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव म्हणून आम्ही आपल्यासाठी रोज वेगवेगळ्या औषधी वनस्पतींबद्दल त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती आपल्याला देत असतो. आज आपण ज्या औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत.

त्या वनस्पतीचे नाव ओवा अस आहे. यालाच हिंदीमध्ये अजवाईन अस म्हटल जात. स्वयंपाक घरामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांना चव यावी त्यांचा स्वाद वाढावा, अन्नाच पचन व्यवस्थित व्हाव, पोटात गॅस होऊ नये यासाठी ओव्याच्या बियांचा वापर करत असतो.

जश्या ओव्याच्या बियांपासून आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात तसेच किंवा त्याहून अधिक फायदे आपल्याला ओव्याच्या पानापासून सुद्धा मिळू शकतात. चला तर जाणून घेऊयात ओव्याच्या पानांचे फायदे

ओव्याची पाने दिसायला हिरवीगार आणि मऊ असतात. या पानांमध्ये एंटी-ऑक्सीडेंट, व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन के, सोडियम, लोह, कॅल्शियम आणि अल्प प्रमाणात पोटॅशियम असते. बरेचशे आजार ह्या पानांचा वापर करून बरे होऊ शकतात.

ह्या पानांपासून बनवलेलं सूप, ज्यूस प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ म्हणजेच डिटॉक्स व्हायला मदत होते. ओव्याच्या पानांचे ज्यूस बनवण्यासाठी 5 ते 6 ओव्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या हाताने थोडी बारीक करा त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 तुळशीची पाने टाका नंतर ज्युस बनवण्याच्या भांड्यात थोडे पाणी टाकून बारीक करून घ्या नंतर एक ग्लास पाण्यामध्ये हे मिश्रण टाकून हे डिटॉक्स ज्यूस आपण पिऊ शकता.

ओव्याच्या पानांचे ज्युस आपले पोट दुखत असल्यावर हि घेऊ शकता, हे ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते, भूक लागते,  तोंडाला दुर्गंध येत असेल तर तो निघून जायला मदत होते. सर्दी, खोकला हे आजार बरे व्हायला मदत मिळते. संधिवात कमी व्हायला मदत होते. लघवी करताना होणारा त्रास कमी होतो. रक्तदाब वाढलेला असल्यास हे ज्यूस प्यायल्याने तो नियंत्रणात राहतो.

आपल्याला ओव्याच्या पानांचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *