गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने बरेच फायदे होतात. हे आपल्याला माहित असेलच आज आपण गुळाचा चहा प्यायल्याने काय फायदा होतो हे पाहणार आहोत. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. चहा प्यायल्याने आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा येते. हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे फायदेशीर असते.
गुळाचा चहा बनवण्यासाठी साखरेऐवजी यामध्ये फक्त गुळाचा वापर करावा. गुळाच्या चहामध्ये आले, वेलची, तुळशीची पाने तुम्ही टाकु शकता. चहा उकळल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून तुम्ही गुळाचा चहा प्यायल्यास तो आरोग्यास अत्यंत फायदेशीर ठरतो.
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास गुळाचा चहा घ्या. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर असतो.
गुळाचा चहा प्यायल्याने थकवा दूर होतो. तणावामुळे बऱ्याच जणांना थकवा येतो. अशावेळेस गुळाचा चहा प्यायल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. थकवा जाणवणार नाही.
गुळात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त, तांबे अशी पोषक घटक असतात. जी साखरेमध्ये फार कमी असतात. गुळाचा चहा प्यायल्यामुळे आपल्याला हे सर्व पोषक घटक मिळतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणे फायदेशीर आहे.
गुळाचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी गुळाचा चहा पिणे फायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. आपल्याला जर डायबेटीज चा त्रास असेल तर आपण शक्यतो गुळाचा चहा पिणे टाळा.
आपल्याला गुळाचा चहा पिण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे