- आरोग्य

“पित्ताशयात खडे” होण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव म्हणून आम्ही रोज निरनिराळी आरोग्यासबंधीत महत्वाची माहिती आपल्यासाठी आणत असतो. आपण आमचे फेसबुक पेज लाईक केल्यावर आपल्या हि माहिती नियमित वाचायला मिळू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत; पित्ताशयात खडे कोणत्या कारणामुळे होतात, आणि पित्ताशयात खडे होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे.

वयाच्या चाळीशीनंतर आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आपण आपल्या शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही. बैठे काम असल्याने, आहारात पुरेश्या प्रमाणात फायबर घटक नसल्याने, शारीरीक व्यायाम न करण्यामुळे, तेलकट अन्न खाण्याची सवय असल्याने, फास्टफूड खायची सवय असल्याने आपले वजन वाढत.

वाढलेल्या वजनामुळे आपल्याला पित्ताशयात खडे होण्याच्या समस्येला सामोर जाव लागू शकत. आपल्या शरीरामध्ये अन्न पचन करण्यासाठी लागणारा पाचक रस तयार करण्याचे काम आपले लिव्हर करत असते.

लिव्हरच्या खालच्या बाजूला एक पिशवी असते ज्यामध्ये हा पाचक रस साठवला जात असतो. हा पाचक रस जेवण केल्यानंतर ठरावीक प्रमाणात पचनक्रियेसाठी लहान आतडय़ात सोडला जातो.

आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची गरज असते. आपल्या आहारात तेलकट पदार्थ, स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त झाल्यास किंवा पुरेसे फायबर युक्त पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केल्यास पाचक रसाची घनता वाढून पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार व्हायला लागतात.

हे खडे कोलेस्टेरोल, पिगमेंट, मिश्र या तीन प्रकारचे असतात. यापैकी मिश्र खडे होण्याचे प्रमाण इतर दोन प्रकारापेक्षा जास्त असत. पित्ताशयात तयार होणारे खडे जर लहान आकाराचे असतील तर ते पित्तनलिकेवाटे पाचक रसा बरोबर लहान आतडय़ात निघून जातात.

पण या खड्यांचा आकार जर मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व यामुळे पित्ताशयाला सूज येण्याची शक्यता असते. पित्ताशयातील खडे आकाराने मोठे असल्यास आपण ते शस्त्रक्रिया करून काढू शकता. मात्र जर “खडे आकाराने लहान असतील” तर आपण काही घरगुती उपाय करून बघू शकता.

पित्ताशयातील लहान आकाराचे खडे निघून जाण्यासाठी आपण सकाळी रिकाम्यापोटी 1 ग्लास गरम पाण्यात 10 मिली अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून पिऊ शकता. अँपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेल्या अम्लीय गुणधर्मामुळे लिव्हरमध्ये अतिरक्त कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते.

वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे पित्ताचे खडे होत असतात. नियमितपणे गरम पाण्यासोबत अँपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने पित्ताशयातील खड्यांमुळे होणाऱ्या वेदना कमी होतील. तसेच पित्ताशयातील लहान आकाराचे खडे हळूहळू वितळून शरीरातून बाहेर पडतील.

पित्ताशयातील लहान आकाराचे खडे निघून जाण्यासाठी आपण सकाळी कोमट पाण्यासोबत 2 चमचे लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. काही दिवस नियमित कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस प्यायल्याने पित्ताशयातील लहान आकाराचे खडे वितळून शरीरातून बाहेर पडतील.

पित्ताशयात खडे होऊ नये यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकता. आपल्या आहारामध्ये तळलेले पदार्थ, फास्ट फूड असेल तर ते खाणे कमी करा. अथवा बंद करा. रोजच्या आहारामध्ये कोशिंबीर, सलाड अशा फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा.

पपई, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी अशी फळे आपल्या आपल्या रोजच्या आहारात असुद्या. नियमित शारीरिक कसरतीचा व्यायाम करा. न जमल्यास सकाळ, संध्याकाळ अर्धा तास चालायला जा. सायकल चालवा, पोहायला जा.

वरती दिलेले उपाय हे पित्ताशयातील लहान आकाराचे खडे निघून जाण्यासाठी आहेत. त्यामुळे “मोठ्या आकाराचे खडे असल्यास आणि त्या खड्यांमुळे आपल्याला त्रास होत असल्यास” आपण जवळच्या डॉक्टरांची मदत घेऊ शकता.

आपल्याला “पित्ताशयात खडे” होण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *