उष्णतेमुळे आपल्या शरीराला घाम येतो. घामामधून शरीरामधील टॅाक्सीन बाहेर येत असतात. म्हणून घामाला एक वेगळा दर्प असतो. यामुळेच जास्त वेळ घातलेल्या कपड्यांना, सॉक्सला दुर्गंध येतो. हा दुर्गंध कधी कधी पायांना हि येतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. शूज काढल्यावर पायांचा दुर्गंध येत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.
शूज काढल्यावर पायांचा दुर्गंध येत असल्यास एका टब मध्ये कोमट पाणी घ्या त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा सैंधव मीठ टाका. नंतर त्या पाण्याने आपले पाय चांगले धुऊन घ्या. असे केल्याने पायांचा दुर्गंध निघून जाण्यास मदत मिळेल.
पायांना दुर्गंध येत असल्यास हातावर थोडेसे व्हिनेगर घ्या. आणि ते आपल्या पायांना लावा. काही वेळाने पाय पाण्याने धुऊन टाका.व्हिनेगर लावल्याने पायांचा दुर्गंध कमी होईल.
पायांना दुर्गंध येत असल्यास एका टब मध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे त्या पाण्यात पाय बुडवून ठेवा. असे केल्याने पायांचा दुर्गंध निघून जाईल.
पायांना दुर्गंध येऊ नये यासाठी आपण पुढील प्रकारे काळजी घेऊ शकता. घामामुळे शूजमध्ये बॅक्टेरिया तयार होत असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी काही वेळ शूज उन्हात ठेवा. पायांचा दुर्गंध येऊ नये यासाठी आपले सॉक्स रोजच्या रोज बदला.
रात्री संत्र्याची साल शूजमध्ये ठेवल्याने सुद्धा शूज मधून येणारा दुर्गंधी कमी होईल. आपल्याला “शूज काढल्यावर पायांना दुर्गंधी येत असल्यास त्यावरील घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.
अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.