- आरोग्य

मासिकपाळी नियमित येत नसल्यास करा हे घरगुती उपाय

मासिकपाळी हा स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. मासिकपाळी नियमित येणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगल असत. साधारणपणे मासिकपाळी 21 ते 35 दिवसांच्या कालावधीत येते. तसेच 2 ते 7 दिवसांपर्यंत तिचा कालावधी असतो.

मात्र काही वेळेस हा कालावधी कमी किंवा जास्त झाल्यास याला अनियमित मासिकपाळी अस म्हटल जात. मासिकपाळी अनियमित होण्यामागे कोणकोणती कारणे असू शकतात हे आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे बऱ्याचदा मासिकपाळी अनियमित होत असते.

याचबरोबर आपले वजन जास्त प्रमाणात वाढलेलं असल्यास, थायरॉईड सबंधित आजार असल्यास, आहारात पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणावामुळे, पीसीओडीचा त्रास असल्यास, शारीरिक कसरतीचा अभाव, जन्म नियंत्रण गोळ्यांचा वापर केल्याने सुद्धा मासिकपाळी अनियमित येऊ शकते.

मासिकपाळी वेळेवर न आल्यास स्त्रियांना भूक न लागणे, पोटात दुखणे, हात, पाय, कंबर दुखणे, थकवा आल्यासारखे वाटणे, मळमळ होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जाव लागू शकत. मासिकपाळी अनियमित येत असल्यास आपण त्यावर काही प्राथमिक घरगुती उपाय करू शकता.

मासिकपाळी नियमित येण्यासाठी आपण रात्री झोपायच्या आधी 2 चमचे बडीशेप कपभर पाण्यात भिजायला ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर कपातील बडीशेप मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये साधारणपणे ग्लासभर पाणी मिसळून नंतर ते प्या.

काही दिवस हा उपाय केल्याने मासिकपाळी नियमित होईल. मासिकपाळी नियमित येण्यासाठी आपण आपल्या आहारात पपईचा समावेश करू शकता. पपई खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे मासिकपाळी नियमित येते.

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता झाल्याने हार्मोन्स असंतुलित झाले असल्यास आपण आपल्या आहारात बीट ज्यूस, सलाड घेऊ शकता. बीटाचा आहारात समावेश केल्याने रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत मिळते.

मासिकपाळी नियमित येण्यासाठी आपले वजन नियंत्रणात असणे आवश्यक असत. आपल्या आहारात पोषक घटक म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, दुध, दुग्धजन्य पदार्थ असणे गरजेचे आहे. यासोबतच पुरेशी झोप घेणे,  मानसीक तणाव असल्यास प्राणायाम करणे या गोष्टी आपण करू शकता.

आपल्याला मासिकपाळी नियमित येत नसल्यास कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. हि माहिती डॉ. के के अग्रवाल यांच्या अनियमित मासिकपाळीवर उपाय ह्या लेखावर आधारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *