- आरोग्य

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

एका जागेवर बसून काम, जादा फॅट असलेला आहार, कधीकधी शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर चरबी जमा होत असते, आणि तुमचा चेहरा मोठा दिसू लागतो. मासिक पाळी दरम्यान, आपल्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात.

त्यावेळी, आपल्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढलेली असते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सूज येते. या स्थितीला पीएमएस सिंड्रोम म्हणतात. या आणि इतर काही कारणामुळे आपला चेहरा थुलथुलीत दिसायला लागतो.

आहारात ठराविक बदल आणि व्यायाम केल्यामुळे आपण शरीरावरील चरबी कमी करू शकतो.  परंतु चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारात काय बदल करायचे असतात या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारात साखर आणि मिठाचा वापर जितका कमी करता येईल तितका करा. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी दिवसातून 2 / 3  कप ग्रीन टी प्या.

ग्रीन टी मध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सने आपल्या  शरीरातील मेटाबॉलिजमसाठी मदत मिळते आणि शरीरातील टॉक्झिन्स कमी होण्यास मदत मिळते. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपला चेहरा सुजलेला दिसतो. आपण नियमित 6 / 7 तास झोप घेणे गरजेचे असते. चांगली झोप घेतल्यास खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अतिरिक्त फॅट वाढत नाही.

शरीरात पाणी कमी पडल्यामुळे गालावर सूज येऊ शकते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायम योग्य ठेवली पाहिजे. नियमित 3 / 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. आहारात फळे, भाज्यांचा समावेश करा. फळ आणि भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

मद्यपान केल्यामुळे शरीराबरोबरच चेह-यावर सूज येते त्यामुळे मद्यपान करणे टाळा. आपल्या आहारात तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी भाजलेल्या पदार्थांचा समावेश करा. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्यायल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहील.

तुम्हाला तुमचे गाल कमी करायचे असल्यास तुम्ही स्माईलिंग फिश हा चेहऱ्याचा व्यायाम करू शकता. यासाठी गाल आत ओढून माश्यासारखे ठेवायचे असतात. साधारणपणे 1 मिनिटापर्यंत असे करा. दिवसभरात 5 ते 6 वेळा असे केल्याने फरक जाणवेल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *