- इन्फोमराठी

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा असतो?

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

बऱ्याचवेळा आपल्या सातबाऱ्यावर जितक्या जमिनीची नोंद आहे. तितकी जमीन आपल्या दिसत नाही. मग आपल्या मनात येत कि शेजारच्याने आपल्या जमिनीवर अतिक्रमण तर नसेल केल.

आपल्या मनात अशी शंका आल्यावर आपण शासकीय मोजणी करायचा विचार करू लागतो. परंतु शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा. आणि तो कुठे जमा करायचा?

त्या अर्जासोबत किती शुल्क जमा करायचे असते. त्यानंतर किती दिवसांनी शासकीय जमीन मोजणी केली जाते. हे आपल्याला माहित नसत. म्हणूनच अगदी सोप्या भाषेत आज आपण जाणून घेऊयात जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा असतो?

जमीन मोजणीसाठी करायच्या अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर मोजणीसासाठी अर्ज या नावाने आपल्याला मिळू शकतो.

हा अर्ज भरताना आपल्याला सगळ्यात आधी आपण ज्या जिल्ह्यामधून अर्ज भरत आहात त्या जिल्ह्याचे नाव मग तालुक्याचे नाव ज्यांच्या नावे जमीन आहे त्या अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता अशी माहिती भरायची आहे.

त्यानंतर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे. ह्या ठिकाणी आपण शेत जमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का असा उद्धेश लिहू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक भरायचा असतो.

आपल्याला जितक्या क्षेत्राची मोजणी करायची आहे. आणि किती कालवधीत ती केली जावी यावर आपली मोजणी फी अवलंबून असते. त्यानंतर आपल्याला जितक्या क्षेत्राची मोजणी करायची आहे त्यानुसार फीची रक्कम लिहायची आहे.

जर आपला सातबारा एका पेक्षा अधिक लोकांच्या नावावर असेल तर आपल्याला त्या सर्वांच्या संमतीदर्शक सह्या लागू शकतात. हे सर्व झाल्यानंतर तो अर्ज शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात हा अर्ज जमा करायचा आहे. मग शासनाच्या वतीने आपण दिलेल्या कालावधीत शासकीय जमीन मोजणी केली जाईल.

शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. जमीन मोजणीचा अर्ज, मोजणी फी भरल्याची पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबाऱ्याची प्रत इत्यादी कागदपत्र आपल्याला जमिनीची मोजणी आणण्यासाठी लागतात.

आपल्याला जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा असतो? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *