- आरोग्य

जेवण केल्यानंतर 4 दिवस पपई खाल्याने मिळणारे फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव म्हणून आम्ही आपल्यासाठी नियमीत वेगवेगळ्या फळांपासून मिळणाऱ्या फायद्याविषयी चांगली माहिती आपल्यासाठी आणत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत त्या फळाचे नाव आहे पपई यालाच हिंदी मध्ये पपीता असे म्हणतात.

पपई चवीला गोड, शरीराला पोषक आणि आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, नियासिन, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॅरोटीन, फायबर, फोलेट, पोटॅशियम, तांबे, आणि इतर अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात. चला तर जाणून घेऊयात पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. आपण नियमित 4 दिवस दुपारी जेवण केल्यानंतर पपईचे सेवन केले तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित व्हायला मदत होते.

पपईमध्ये असणारे पपेन नावाचे एंजाइम आपण खाल्लेलं अन्न पचायला मदत करते. म्हणून ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी दुपारी जेवण केल्यानंतर पपई खाल्ली पाहिजे. ज्यांना वजन कमी करायचे आहे ते सुद्धा पपईचा आपल्या आहारात समावेश करू शकतात. पपई खाल्ल्याने आपले पोट बराच वेळ भरलेले राहते.

पपई खाल्याने त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने या गोष्टी आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त असतात. पपई खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.

पपईमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाल्याने आपली हाडे मजबूत व्हायला मदत मिळते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. पिकलेल्या पपईचा गर आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. याचबरोबर त्वचेवरील डाग साफ होतात.

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, पपई खाल्याने केसांची मुळे मजबूत होतात तसेच केस लांब आणि सुंदर होतात. महत्वाची सूचना – पपई उष्ण गुणधर्म असणारे फळ असल्याने पपईचे सेवन गर्भवती स्त्रियांनी आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी करू नये. शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर पपई खाणे टाळा.

आपल्याला पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *