- आरोग्य

डोळ्यांना आलेली (बिलणी) रांजणवाडी घालवण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांच्या पापणीवर किंवा पापणीच्या कडेवर आलेल्या फोडाला किंवा गाठीला रांजणवाडी असे म्हटल जात. बऱ्याचदा अचानकपणे डोळ्याना वेदना सुरू होऊन पापणीवर सूज येते.

डोळे लाल होतात, डोळ्यात काहीतरी टोचतय असे वाटत राहणे, डोळ्याला सारखी सारखी खाज येणे, आणि डोळ्यांमधून पाणी येणे अशी लक्षणे आढळल्यास आणि त्यानंतर पापणीवर फोड, पुरळ जाणवल्यास रांजणवाडी झाली असे समजावे.

डोळ्यांना रांजणवाडी येण्याची मुख्य कारणे – आपल्याला सतत डोळ्यांना हात लावायची किंवा डोळे चोळण्याची सवय असल्यास आपल्याला रांजणवाडी येऊ शकते. आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्तीची कमी असल्यास आपल्याला रांजणवाडी होऊ शकते.

याबरोबरच सध्याच्या प्रदूषित वातावरणामुळे बऱ्याचदा आपल्या डोळ्यांमध्ये धुळीचे लहान लहान कण जात असतात. हे कण डोळ्यात गेल्याने डोळ्यांना खाज येते त्याबरोबरच डोळ्यामधून पाणी हि येत.

वेळीच हि घाण काढली न गेल्यास हि डोळ्याच्या पापण्यावर गाठी येऊ शकतात. हार्मोन्स मधील बदलामुळे सुद्धा रांजणवाडी येऊ शकते या बरोबरच पुरेसे पाणी न पिणे, तिखट आणि तेलकट पदार्थाचा आहारात अत्याधिक समावेश असणे अशा गोष्टी रांजणवाडी येण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात.

डोळ्यांना रांजणवाडी आल्यास ती घालवण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती करू शकतो याविषयी जाणून घेऊयात. डोळ्यांना आलेली रांजणवाडी घालवण्यासाठी थोडेसे कोमट पाणी घ्या त्यामध्ये सुती कपडा बुडवून त्या कपड्याने डोळे बंद करून पापणीवर ज्या ठिकाणी फोड किंवा पुरळ आलेली आहे त्या ठिकाणी शेकवा. दिवसातून 3 ते 4 वेळा आपल्याला असे करायचे आहे. असे केल्याने सूज व वेदना कमी होण्यास मदत होईल.

रांजणवाडी घालवण्यासाठी रांजणवाडी आलेल्या पापणीवर ज्या ठिकाणी फोड किंवा पुरळ आलेली आहे त्या ठिकाणी कोरफडीचा गर दिवसातून 4 वेळा लावल्यास पुरळ जाण्यास मदत होईल आणि आपल्याला लवकर आराम मिळेल.

आपल्या शरीरावरील डोळे हा अवयव सगळ्यात नाजूक असतो. आपल्याला रांजणवाडी येऊ नये असे वाटत असेल तर आपण पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नियमित झोप पुरेशी घेणे गरजेचे आहे. कमीत कमी 6/ 7 तास झोप आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.

चेहऱ्याला लावण्यासाठी आपण जी प्रसाधने वापरता त्यांचा वापर करताना डोळ्यांच्या जवळ लावू नका. निकृष्ट दर्जाची सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा, डोळे सारखे सारखे चोळू नका.

दिवसभरात पुरेसे पाणी प्या. बाहेर फिरताना गॉगलचा वापर करा जेणेकरून धुळीचे लहान कण आपल्या डोळ्यात जाणार नाही. लक्षात ठेवा रांजणवाडीवर दाब देऊन ती फोडण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे जंतूसंसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता असते.

आपल्याला डोळ्यांना आलेली (बिलणी) रांजणवाडी घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *