- इन्फोमराठी

7/12 उतारा म्हणजे नेमक काय असतो? संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा. आज आपण 7/12 उतारा म्हणजे नेमक काय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल कायदा 1971 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्काची नोंद ठेवण्यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तक ठेवलेली आहेत. या नोंदणी पुस्तकांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क अशा गोष्टींचा समावेश असतो.

याबरोबरच 21 वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने यामध्ये असतात. यापैकी गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे दोन नमुने मिळून सातबारा उतारा तयार होतो. या मुळेच उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हटलं जात.

गाव नमुना 7 मध्ये आपल्याला पुढील बाबी पाहायला मिळतात. सर्वप्रथम शेताचे नाव, मालकी हक्क कोणापाशी आहे त्यांचे नाव, भोगवटादार असेल तर भोगवटादाराचे नाव, जमीनीचा गट क्रमांक, एकूण किती क्षेत्र आहे, लागवड योग्य क्षेत्र किती आहे, पोटखराबा किती आहे, जिरायती – बागायती असे उल्लेख यामध्ये असतात.

तर गाव नमुना 12 मध्ये सबंधित जमिनीवर कोणकोणत्या प्रकारची पिक घेतली जातात त्याची नाव, जमीन जलसिंचनाखाली आहे की नाही या विषयी खुलासा, जलसिंचनाची कोणकोणती साधने वापरली जातात, विहिर, कूपनलिका अशी सगळी माहिती या नमुन्यामध्ये असते. हे दोन्ही उतारे एकत्रित रित्या सातबारा म्हणून प्रचलित आहेत.

हा 7/12  उतारा हा महसूल विभागामार्फत तहसिलदाराकडून दिला जातो. या उताऱ्यामध्ये जमीन धारकाकडे असलेली जमीन किती आहे आणि कोणत्या प्रकारची आहे हे कळते.

या उतारावर गाव, तालुका, जिल्हा यांची नोंद केलेली असते. 7/12  उताऱ्याला जास्त महत्त्व असण्याचे कारण असे की हा मालकीहक्काचा प्राथमिक आणि अंतिम पुरावा असतो. महाराष्ट्र सरकारच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही हा उतारा पाहू शकता

आपण एखादी जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर आवर्जून त्या जमिनीचा 7/12  उतारा आणि फेरफार बघा म्हणजे आपल्याला त्या जमिनीविषयी पूर्ण माहिती मिळेल.

आपल्याला 7/12 उतारा म्हणजे नेमक काय असतो? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *