- आरोग्य

किवी फळ खाल्याने मिळणारे फायदे

किवीचे फळ बाहेरून चिकू सारखे दिसते आणि आतून मऊ आणि हिरवे असते. त्यामध्ये लहान काळया बिया असतात, या फळाची काहीशी चव तुरट अशी असते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या या फळाचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही हे फळ नक्की चाखून पहाल.

किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडेंट्स आणि अनेक प्रकारचे खनिजे आढळतात, जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर जाणुन घेउयात.

किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्यामुळे, किवी खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत मिळते. दिवसभराच्या कामानंतर येणारा थकवा दूर करण्यासाठी किवी खाऊ शकता.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे किवी आपल्या शरीराला लोह शोषण्यास मदत करते. किवीमध्ये असलेले सेरोटोनिन नावाचे तत्व आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करतात.

किवीमध्ये फॉलिक एसीड असल्याने गर्भवती महिलांनी डॉक्टरच्या सल्ल्याने किवीचे सेवन करू शकतात. किवी खाल्याने मुलाच्या मेंदूच्या विकासास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. किवीमध्ये असणारे फायबर आणि पोटॅशियम हृदयरोगापासून आपल्यापासून दूर राहण्यास मदत करतात. किवी खाल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

किवीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आपण किवी खाऊ शकता. किवीमध्ये पोटॅशियम हा घटक असतो जो हाडे आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतो.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे, कीवीचे सेवन केल्याने आपली त्वचा खूप मऊ आणि चमकदार बनते. यामुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत मिळते. किवी खाल्याने त्वचा मऊ, चमकदार आणि सुरकुत्या मुक्त राहण्यास मदत मिळते. कीवीचे सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

आपल्याला किवी फळ खाल्याने मिळणारे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *