- आरोग्य

कोलाइटिस आजार काय असतो? लक्षणे आणि घरगुती उपाय

नमस्कार, आपण स्वस्थ आणि निरोगी राहावं म्हणून आम्ही आपल्यासाठी नियमित आरोग्याविषयी महत्वपुर्ण माहिती देत असतो. आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करून नोटीफीकेशन चालू केले तर आम्ही केलेल्या सगळ्या माहितीपूर्ण पोस्ट आपल्याला वाचायला मिळू शकतात.

आज आपण ज्या आजाराविषयी आज जाणून घेणार आहोत तो आपल्या पोटासंबंधी असणारा आजार आहे. ह्या आजाराचे नाव कोलायटीस अस आहे. या आजारामध्ये आपल्या पोटामध्ये असणाऱ्या मोठ्या आतड्याला सूज आलेली असते. बऱ्याचदा आपल्या घरातील वयस्कर माणसाना या आजाराचा सामना करावा लागत असतो.

कोलायटीस ह्या आजाराची लक्षणे आपण समजून घेऊयात. कोलाइटिस हा आजार असल्यास भूक कमी होते, आतड्यांना सूज येते, वजन कमी होते, पोटात दुखत राहत. कोलायटीस ह्या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आपण हे काही घरगुती उपाय करू शकता.

कोलायटीस ह्या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आपण ग्रीन टी पिणे सुरू करू शकता. ग्रीन टी प्यायल्याने आपल्याला बऱ्या पैकी आराम मिळू शकेल. त्याचबरोबर कोलायटीस हा आजार असल्यास आपण कोरफड गरापासून बनवलेलं ज्यूस पिवू शकता.

कोलाइटिस हा आजार असल्यास आपण पुढील प्रकारे काळजी घ्या. कोलाइटिसमुळे ओटीपोटात दुखत असल्यास दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करा. ब्रोकोली आणि फुलकोबीमुळे जास्त त्रास होऊ शकतो, म्हणून या गोष्टी खाणे टाळा.

मसालेदार पदार्थ, अल्को’होल आणि कॉफी पिणे टाळा. यामुळे, कोलाइटिसचा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो. दिवसातून पाच किंवा सहा वेळा थोड्या प्रमाणात अन्न खा. यामुळे अन्न सहज पचेल.

आपल्याला कोलाइटिस आजार काय असतो?  लक्षणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *