- आरोग्य

सर्दी, खोकला आणि कफ, घसादुखी यावर प्रभावी इलाज दालचिनीचे फायदे

नमस्कार, आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्याला आम्ही पोस्ट केलेल्या सगळ्या पोस्ट वाचायला मिळू शकतात.

आज आपण दालचिनी ह्या मसाल्याच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात चहामध्ये, भाज्यांना आणि आमटीला चव येण्यासाठी आणि एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येण्यासाठी आपण दालचिनीचा वापर नक्कीच केला असेल. दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. दालचिनीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे महत्वाचे फायदे आज आपण जाणून घेऊयात

घसा दुखत असल्यास, घश्यात खवखव होत असल्यास चमचाभर साखर, थोडीशी दालचीनी, आणि ज्येष्ठमध कपभर पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्या नंतर कोमट असतानाच हा काढा दिवसातून दोनवेळा घ्या असे केल्याने घसा दुखी थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल.

सर्दी, खोकला आणि कफ अशा समस्या उद्भवल्यास कपभर पाणी घ्या त्यामध्ये दालचिनीचे तुकडे मिसळून चांगले उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून हे पाणी प्या आपल्याला आराम वाटेल.

सकाळी झोपेतून उठल्यावर एक कपभर पाण्यात दालचिनीचे तुकडे करून घाला. ते उकळून घ्या. गाळून घ्या. नंतर कोमट असतानाच हा दालचिनीयुक्त काढा प्यायल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत होईल.

सकाळी दालचिनीयुक्त काढा प्यायल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रोल कमी होईल. मात्र हा काढा आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्या. जास्त प्रमाणात ह्या काढ्याचे सेवन करू नका.

सकाळी दालचिनीयुक्त काढा प्यायल्याने आपली पचनशक्ती चांगली व्हायला मदत मिळते. दालचीनी हा उष्ण गुणधर्म असणारा मसाल्याचा पदार्थ असल्याने याचे सेवन हे थोड्या कालावधी साठी आणि कमी प्रमाणातच करणे आपल्यासाठी हितकारक आहे.

आपल्याला दालचिनीचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *