- आरोग्य

चेहऱ्यावर लाल पुरळ (पिंपल्स) येत असल्यास करा हे उपाय

आपण आपला चेहरा सुंदर दिसावा. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा वापर करतो. मात्र या क्रीममुळे आपल्या एलर्जी होते चेहऱ्यावर लाल रंगाचे पुरळ (पिंपल्स) यायला लागतात. या बरोबरच वातावरणातील धुळीची एलर्जी होऊन सुद्धा लाल पुरळ येऊ शकतात.

हे लाल पुरळ संपूर्ण अंगभर अथवा चेहऱ्यावर येतात. या पुरळांवर खाज येत असते. ही खाज असह्य झाल्यामुळे आपण त्यांना नख लावतो त्यामुळे हे पुरळ मोठे होतात. तसेच हे पूरळ फुटून काळे डाग पडतात. लाल पूरळ आल्यानंतर त्यांना नखे न लावता काही घरगुती उपाय करून हे पुरळ आपण कमी करू शकता.

क्रीम्सच्या इन्फेक्शनमुळे पुरळ येत असतील तर अशावेळी केमिकलयुक्त कोणत्याही प्रोडक्टचा वापर करू नका. साबण लावणे टाळा. त्या ऐवजी आयुर्वेदिक उटणे वापरा.

कोरफड गरामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. लाल पुरळ उठून खाज सुटली असेल तर त्यावर आपण कोरफड गर लावू शकता. कोरफड गर लावल्याने थंडावा येईल आणि खाज कमी होईल. काही दिवस कोरफड गर चेहऱ्यावर लावल्याने पुरळ कमी होतील.

पुरळ उठून लालपणा आला असेल तर हा लालपणा कमी करण्यासाठी आपण या पुरळावर बर्फ लावू शकता. यासाठी सुती कपड्यामध्ये बर्फाचा लहानसा तुकडा ठेवून तो हलक्या हाताने 2 मिनिटे आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. बर्फ फिरवल्याने खाज कमी होईल.

अंगावर पुरळ येऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. त्यासाठी कपड्यांना डेटॉल पाण्यामधून काढा. तसेच आहारामध्ये फळांचा, भाज्यांचा समावेश करा. कोणतीही क्रीम वापरताना काळजी घ्या.

जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी नवीन प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करणार असाल, तर आधी ते कमी प्रमाणात वापरा. आपल्या त्वचेला त्याची सवय होऊ द्या. जुनी, एक्सपायरी डेट उलटून गेलेली, व्यवस्थित न झाकलेली सौंदर्यप्रसाधनं वापरणं टाळा.

आपल्याला चेहऱ्यावर लाल पुरळ आल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *