- आरोग्य

दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार, आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्याला आम्ही पोस्ट केलेल्या सगळ्या पोस्ट वाचायला मिळू शकतात.

कधीकधी अचानक आपल्या हातामध्ये, पायाला वेदना सुरु होतात. हात, पाय बधीर झाल्यासारखे वाटत, अस वाटत कि आपल्या हातापायांना मुंग्या आल्या आहे. एकाच जागी बराच वेळ बसून काम केल्याने शरीरातील हाता पायामधील एखादी रक्तवाहिनी दबली जाते, तेव्हा आपल्याला चालणे, उठणे आणि बसणेही कठीण होऊन जात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी काही प्राथमिक घरगुती उपाय

दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी आपण जाणकार माणसाकडून मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करू शकता. मालिश केल्याने त्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत मिळते. आणि आपल्याला वेदनेपासून आराम मिळतो.

नसा मोकळ्या होण्यासाठी आपण कोमट पाण्यात 2 चमचे सैंधव मीठ टाकून त्यामध्ये आपला वेदना देणारा हात, पाय 10 मिनिटे ठेवा. असे केल्याने आपल्या वेदना कमी होतील.

नसा मोकळ्या होण्यासाठी आपण पारिजातक पानाचा काढा 7 ते 8 दिवस घेऊ शकता. यासाठी 250 ग्राम पारिजातक पाने स्वच्छ धुऊन घ्या, त्यानंतर त्याचे हातानेच तुकडे करून 1 लिटर पाण्यात टाकून उकळून घ्या. पाणी अर्धे होईस्तोवर उकळा. त्यानंतर हा काढा कोमट असतानाच अर्धा कपभर प्रमाणात प्या.

शक्यतो सकाळच्या वेळी प्यायलेल उत्तम राहील. जर आपल्याला जास्त प्रमाणात वेदना होत असतील तर आपण दिवसातून दोन वेळा हा काढा पिवू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या हा काढा ज्यांना मुळव्याध किंवा उष्णतेचा कोणताही आजार आहे त्याने पिणे टाळा.

आपली चालण्याची, बसण्याची, झोपण्याच्या ‘चुकीच्या स्थितीमुळे’ हा त्रास वाढू शकतो म्हणून लक्षात ठेवा की आपल्या हातापायाच्या नसांवर दाब पडणार नाही अश्या पद्धतीने झोपा. एका जागी जास्त वेळ बसणे टाळा. भरपूर पाणी प्या.

जेणेकरून आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहील. दिवसभरात अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम करा, शरीरातील स्नायूंच्या मजबुतीसाठी आपण सायकल चालवणे, पोहणे, धावणे योगा करणे अशा गोष्टी करू शकता.

आपल्याला दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *