- आरोग्य

आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे

नमस्कार, आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्याला आम्ही पोस्ट केलेली सगळी माहिती वाचायला मिळू शकते.

कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदात हजारो वर्षांपासून केला जातो. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि त्वचेच्या अनेक आजारावर मात करण्यास उपयोगी असते.

कडुलिंबाच्या पानांची चव कडू असते, पण हाच गुण आपल्यासाठी खूप उपयोगी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे.

आयुर्वेदात कित्येक शतकांपासून कडुलिंबाच्या पाण्याने स्नान करण्याची परंपरा चालली आहे. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर मानले जाते.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या संपूर्ण शरीरास डिटॉक्स करण्यास मदत मिळते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या संबंधित अनेक समस्यांपासून आपण वाचू शकता. मुरुम आणि त्वचेच्या एलर्जी दूर राहण्यास मदत मिळते.

कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला येणारी खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे मुरुम, आणि त्वचेवरील डाग बरे होण्यास मदत होते.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. केसांतील कोंडा आणि खरुज पासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे एक चांगला उपाय आहे. कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या केसांना चमक येते.

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा दूर व्हायला मदत मिळते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्याच्या आजूबाजूला असणारे त्रासदायक बॅक्टरीया आपोआप मारले जातात.

या सोबतच कडूलिंबाच्या पानाचा अजून एक उपयोग आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जर आपल्या चेहऱ्यावर डाग असतील तर ते कमी करण्यासाठी आपण दोन चमचे मधात थोडासा कडूलिंबाच्या पानांचा रस मिसळून चेहऱ्यावरच्या गडद काळ्या डागांवर लावा. काही मिनिटे हा थर चेहऱ्यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होईल.

आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पान टाकून आंघोळ करण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *