- आरोग्य

जर ‘मुतखडा’ हा आजार होऊ द्यायचा नसेल तर अशा प्रकारे घ्या स्वताची काळजी

बऱ्याचदा आपण कामाचा ताण वाढल्याने या ताणामुळे आपण अन्न पाण्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम काही दिवसांनी दिसू लागतो. या कमी पाणी पिण्याच्या सवयीने अनेक जणांना मुतखड्याचा त्रास सुरू झाल्याचे आपण बघत आहोत.

किडनी हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे जो रक्ताची स्वच्छता करतो आणि मूत्रमार्गातून यूरिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक प्रकारच्या हानिकारक पदार्थांना काढून टाकण्याचे कार्य करतो. आजकाल मुतखडा हि समस्या अगदी सामान्य बनली आहे.

यासाठी मुतखडा का होतो? आणि मुतखडा झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? ह्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच मुतखडा होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

मूत्रपिंडात न विरघळलेले स्फटिकजन्य घटक साचुन मुतखडा तयार होतो. मूतखड्याच्या समस्येवर त्वरित इलाज केला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. यासाठी या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मुतखडा होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या.

मुतखडा होऊ नये यासाठी सर्वात पहिले भरपूर पाणी पिण्याची सवय स्वताला लावा. पाणी कमी प्यायल्याने मूत्रपिंडात स्फटिकजन्य पदार्थ तसेच साचुन राहतात. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील नको असलेले क्षार बाहेर टाकले जातात.

यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी 3 ये 4 लिटर पाणी प्या. वारंवार लघवीला जाव लागत म्हणून बरेच जण पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतात. अजून एक महत्वाची गोष्ट लघवीला लागल्यावर लघवी जास्त वेळ थांबवून ठेवणे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

मुतखडा होऊ नये यासाठी आपण तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचं या गोष्टी जास्त प्रमाणात आणि वारंवार सेवन करु नका. मुतखडा होऊ नये यासाठी आपल्या आहारात मीठाचं सेवन कमी प्रमाणात करा. जास्त मीठामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढू शकत. त्यामुळे भाजीमध्ये मीठ कमीच वापरा. त्यासोबतच वरुन मीठ घेऊ नका.

अ’ल्कोहोलमध्ये प्यूरीन एसिड आढळतं. जे मुतखडा तयार होण्यास मदत करतं. त्यामुळे आपल्याला मुतखडा होऊन द्यायचा नसल्यास अ’ल्कोहोल घेणे टाळावे लागेल. जर पाणी वारंवार पिले जात नसेल तर तुम्ही ज्यूस पिऊ शकता.

पाणी पिताना विशेष काळजी घ्या. पाणी शुद्ध असायला हव. सहसा बोरिंगचे पाणी पिऊ नका. कारण बोरिंगच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असतात. त्यामुळे असे पाणी प्यायल्याने मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते.

आपल्याला ‘मुतखडा’ हा आजार होऊ द्यायचा नसेल तर आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *