- इन्फोमराठी

हक्कसोडपत्र कसे करावे? त्यासाठी असणारे नियम व अटी कोणकोणत्या आहेत जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा. आज आपण हक्कसोडपत्र म्हणजे नेमक काय हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबामधील कोणत्याही सदस्याने त्याच्या एकत्र कुटुंबामधून मिळणाऱ्या मिळकतीवरचा  वैयक्तिक हिस्सा स्वेच्छेने त्याच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या लाभासाठी कायमस्वरूपी सोडून दिल्याचा दस्ताऐवज होय. हक्कसोडपत्र हे फक्त वारसहक्काने मिळालेल्या एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील स्वताच्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते करता येऊ शकते.

हक्कसोडपत्र हे एकत्र कुटुंबामधील कोणत्याही स्त्री पुरुष सदस्याला करता येत. इथ एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हक्कसोडपत्र हे एकत्र कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीच्या नावे आपल्याला करता येत नाही.

हक्कसोडपत्र हे सहसा विनामोबदला केल जात. हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या लाभासाठी केल जात असल्याने त्यासाठी मुद्रांक शुल्क आकारल जात नाही. मात्र त्याची नोंदणी केली जात असल्याकारणाने त्यावर नोंदणी शुल्क आकारले जात. नोंदणीकृत हक्कसोडपत्रच ग्राह्य धरल जात.

आता आपण जाणून घेऊयात हक्कसोडपत्र कसे करावे? एकत्र कुटुंबामधील ज्या सदस्याला आपल्या मिळकतीवरील हिस्सा आपल्याच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या लाभासाठी सोडायचा आहे. त्यांचे सहमतीपत्र साधारणता 200 रुपयांच्या मुद्रांकपत्रावर लेखी असावे. त्यामध्ये पुढील नोंदी असाव्यात

हक्कसोडपत्र लिहून देणाऱ्याचे नाव, त्याचे वय, पत्ता, व्यवसाय याबाबतचा तपशील त्यामध्ये असावा. त्यानंतर एकत्र कुटुंबातील सर्वशाखांची वंशावळ, एकत्र कुटुंबामधील सर्व मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण अशा गोष्टी लागतात.

या सोबतच हा दस्ताऐवज लिहून घेतावेळी दोन साक्षीदारांची गरज लागते. दस्ताऐवजावर साक्षीदारांची नाव, पत्ता, व्यवसाय याबाबतचा तपशील आणि स्वाक्षरी अशा गोष्टी नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात. अशा प्रकारे तयार करण्यात आलेले हक्कसोडपत्र तलाठ्याकडे जमा करावे.

आपल्याला हक्कसोडपत्र कसे करावे? त्यासाठी असणारे नियम व अटी कोणकोणत्या ह्या विषयी असणारी ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *