- आरोग्य

“अंडरआर्मचा काळेपणा” दूर करण्यासाठी घरगुती उपाय

बऱ्याचदा स्त्रियांना स्लीवलेस कपडे घालाव अस वाटत मात्र हेअर रिमूव्हल क्रीमच्या अतिवापरामुळे, घट्ट कपडे वापरल्याने, डीओ आणि परफ्यूम चा वापर केल्याने त्यामध्ये असणाऱ्या रसायनामुळे आपले अंडर आर्म हळू हळू काळे पडतात. ना त्यांचा आवडता स्लीव्ह लेस ड्रेस घालता येत नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अंडर आर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी हा सोपा उपाय आपण करू शकता यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळा.  त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून आपल्या करून ते अंडरआर्म्सला लावा.

15 मिनिटांनी हाताने चोळून कोमट पाण्याने आपले अंडरआर्म्स स्वच्छ करा. असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल. अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या बटाटाचे तुकडे घेऊन अंडर आर्मवर हलक्या हाताने घासू शकता. आपल्याला लवकरच त्याचा परिणाम दिसेल.

अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे मध घ्या. त्यानंतर मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण आपल्या अंडरआर्म्सला लाऊन अर्धा तास राहूद्या. नंतर हलक्या हाताने त्यावर चोळा काही वेळाने ते धुवा. असे केल्याने अंडरआर्म्सवरील मृत त्वचा निघून जाऊन आपले अंडरआर्म्स परत पूर्वी सारखे दिसू लागतील.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात एक चमचा गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण आपल्या अंडरआर्मसवर चांगले लावा आणि रात्रभर तसेच  ठेवा. सकाळी अंडरआर्म कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने अंडरआर्मचा काळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

अंडरआर्मचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट अंडरआर्मवर 15 मिनिटे  लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने अंडरआर्मचा काळपटपणा दूर होईल.

आपल्याला “अंडरआर्मचा काळेपणा” दूर करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *