- आरोग्य

थंडीमुळे “फुटलेल्या ओठांसाठी” घरगुती उपाय

हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात. अगदी लहान मुलांपासून प्रौढापर्यत सगळ्यानाच ह्या समस्येला सामोर जाव लागत. आज आपण इन्फोमराठीच्या या लेखामधून जाणून घेऊयात हिवाळ्यात आपले ओठ का फुटतात? तसेच फुटलेल्या ओठावर आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

थंडीच्या दिवसांमध्ये आपण पाणी कमी पितो. त्यामुळे आपल्या त्वचेची आद्रता कमी होते. त्वचा कोरडी पडते हे या मागचे मुख्य कारण आहे. त्याचबरोबर व्हिटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे, लोहाच्या कमतरतेमुळे आपले ओठ कोरडे पडू शकतात.

आता आपण जाणून घेऊयात कोरड्या पडलेल्या ओठांना परत पहिल्यासारख करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो. ओठ कोरडे पडू नये यासाठी रात्री झोपायच्या आधी हातावर काही थेंब बदामाचे तेल घ्या.

हलक्या हाताने ते आपल्या ओठावर लावा. रात्रभर राहूद्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपले ओठ परत पाहिल्यासारखे होतील. रात्री झोपायच्या आधी ओठावर गुलाब जल मध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळून लावल्याने आपले ओठ फुटत नाही.

ओठावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एका वाटीत थोडेसे तांदूळ घ्या. त्यामध्ये पाणी टाकून 30 मिनिटे राहूद्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर त्यामध्ये एक चमचा गुलाबजल मिसळून हि तयार पेस्ट आपल्या ओठांवर लावा आणि 2 मिनिटांनी हलक्या हातानी आपल्या ओठावर घासा असे केल्याने आपल्या ओठांवरील डेड स्किन अगदी सहज निघून जाईल. जर ओठ कोरडे पडून रक्त येत असेल तर हा उपाय करू नका.

रात्री झोपताना ओठावर कोरफड जेल लावल्याने सुद्धा आपले ओठ कोरडे पडत नाही. आपले ओठ कोरडे पडू नये यासाठी दिवसभरात पुरेशे पाणी प्या. आपल्या आहारात दुग्धयुक्त पदार्थ असू द्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे असू द्या.

आपल्याला थंडीमुळे फुटलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *