- आरोग्य

रात्रीच्या वेळी या 5 गोष्टी खाल्याने वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढेल

जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल तर यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे असते. वजन कमी करण्यासाठी, खाण्याकडे, काय खावे आणि काय खाऊ नये यावर विशेष लक्ष द्याव लागत. रात्रीच्या वेळी आपण कोणत्या गोष्टी खाल्याने आपले वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढत या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पिझ्झा सर्व वयोगटातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. रात्रीच्या वेळी पिझ्झा खाल्याने पिझ्झ्यामध्ये चीज अधिक प्रमाणात असत. याशिवाय सॉसमध्ये साखरेचा वापर केलेला असतो.

या सोबतच पिझ्झा बनवण्यासाठी मैद्याचा वापर केलेला असतो मैद्यामध्ये भरपूर कार्ब असतात. पिझ्झ्यामध्ये प्रक्रिया केलेले मांस असते. त्याचबरोबर ट्रान्स फॅट देखील असतात म्हणून वजन वाढू नये यासाठी रात्रीच्या वेळी पिझ्झा खाणे टाळले पाहिजे.

बदाम, अक्रोड, काजू किंवा पिस्ता असे ड्राइ फ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र त्यामध्ये जास्त कॅलरीज असतात. झोपेमध्ये जास्त शारीरिक हालचाली नसल्यामुळे झोपायच्या वेळेपूर्वी ते खाणे टाळले पाहिजे.

पैकिंग केलेल्या फळांच्या रसामध्ये (ज्यूस) फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक नसतात. त्यामध्ये ट्रान्स फॅट देखील असतात म्हणून आपण वजन कमी करत असाल तर रात्रीच्या वेळी असे ज्यूस पिणे टाळले पाहिजे. चॉकलेट खाण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु चॉकलेटमध्ये साखर आणि फैट जास्त प्रमाणात असल्यामुळे ते झोपायच्या आधी खाऊ नका.

आईस्क्रीममध्ये भरपूर फैट आणि साखर असते, आईस्क्रीममध्ये भरपूर कॅलरी असतात. ट्रान्स फॅट देखील असतात म्हणून रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाणे टाळले पाहिजे. वजन कमी करत असल्यास बाहेरचे तेलकट पदार्थ खाण सुद्धा थांबवलं पाहिजे.

आपल्याला वजन कमी करायच असेल तर रात्रीच्या वेळी  या 5 गोष्टी खाऊ नका? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *