- Uncategorized

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाही परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. पोट सुटणे या समस्येचा सामना आपल्या पैकी बऱ्याच जणांना करावा लागतोय म्हणूनच आज आपण सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काही चांगले घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.

कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. हे पदार्थ उष्ण गुणधर्म असणारे पदार्थ असल्याने त्याचं सेवन पण अति प्रमाणात करू नका.

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या. ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.

आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खा. यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी व्हायला मदत होईल.

पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया चांगली होऊन अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात शक्य तितक्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील सोबतच आपले वजन हि कमी होण्यास मदत मिळेल.

वजन कमी करायचे असल्यास स्वताला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली  चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. वजन कमी करण्यासाठी जेवण करण्यापूर्वी एक वाटी काकडीचे काप मीठ न लावता खाण्यास विसरू नका. 100 ग्राम काकडीमध्ये  फक्त 16 कॅलरी असतात. म्हणून आपल्याला भूक लागल्यावर एक वाटी काकडी अवश्य खा.

“आपला चयापचय दर चांगला राहण्यासाठी” आणि शरीरात चरबी वाढून द्यायची नसेल तर  आपण दिवसभरात पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी घ्या.

“रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते” त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासा आधी जेवा. रात्रीचं जेवनामध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

आपल्याला “सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या पैकी कोणता उपाय आपण या आधी केला असेल तर आपला कमेन्ट करून अनुभव सांगा. या व्यतिरिक्त सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्याला अजून कोणते घरगुती उपाय माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *