- आरोग्य

रिकाम्या पोटी 5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने कोणकोणते फायदे मिळतात?

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती आणत आहोत. जर आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्या आम्ही प्रसारीत केलेली सगळी माहिती, पोस्ट वाचायला मिळू शकतात.

आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात, बदाम हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.

हे आपल्याला माहीत असेलच बदामामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस झिंक, मॅग्नेशियम, प्रोटीन, फायबर ओमेगा फॅटी – 3 ऍसिड आणि व्हिटॅमिन ई असे अनेक पोषक घटक असतात.

सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम पचायला सोपे असतात. भिजवलेल्या बदामातील पोषक तत्व आपले शरीर चांगल्या प्रकारे शोषून घेते. आता आपण भिजवलेले बदाम कोणी कोणी खाल्ले पाहिजेत  हे जाणून घेऊयात

भिजवलेले बदाम लहान मुले, विद्यार्थी, गरोदर स्त्रिया एकंदरीत सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रीया खाऊ शकतात. भिजवलेले बदाम तयार करणे अगदी सोप आहे. यासाठी बदाम खाण्यापूर्वी 5-6 तास पाण्यात भिजत ठेवायचे असतात.

आता जाणून घेऊयात भिजवलेले बदाम खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात. लहान मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आपण त्यांना भिजवलेले बदाम खायला देऊ शकता.

वजन कमी करायचा विचार करत असाल तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक कप दुधासोबत 5 ते 6 बदाम खाऊ शकता. सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई ह्या पोषक घटकामुळे आपल्या त्वचेला आणि केसांना पोषण मिळते. त्वचा मऊ होते, केस दाट, आणि मऊ होतात.

डायबेटीसचा त्रास असलेल्यांनी भिजवलेले बदाम खाल्यास त्यांच्या शरीरात इन्सुलिन निर्मितीची प्रक्रिया सुधारते. गरोदर स्त्रियांनी भिजवलेले बदाम सेवन केल्याने गर्भाच्या वाढ चांगल्याप्रकारे होते तसेच गर्भाच्या मेंदूची आणि चेता संस्थेची वाढ चांगली होते.

सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने नजर सुधारण्यास मदत होते. सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते. भिजवलेले बदाम सेवन केल्याने बदामात असलेल्या तांब्याचा प्रमाणामुळे रक्त शुद्ध करण्यास देखील मदत मिळते.

आपल्याला “भिजवलेले बदाम खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपण आधीपासून भिजवलेले बदाम खात असाल तर आपला अनुभव कमेन्ट करून सांगा. या व्यतिरिक्त भिजवलेले बदाम खाल्याने अजून कोणते फायदे मिळतात हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *