- आरोग्य

सफरचंद खाल्याने कोणत्या 7 आजारांपासून आपला बचाव होतो? “सफरचंद खाण्याचे” फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव यासाठी आम्ही रोज नवनवीन आणि आरोग्यपूर्ण माहिती आणत आहोत. जर आपण इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक केले तर आपल्या आम्ही प्रसारीत केलेली सगळी माहिती, पोस्ट वाचायला मिळू शकतात.

रोज एक सफरचंद खाल्ल तर आपल्याला डॉक्टरकडे जाव लागणार नाही हे आपण या आधी ऐकल असेलच आपल्या हि मनात हा प्रश्न आला असेलच कि सफरचंदामध्ये असे कोणते गुणधर्म असतात. जे सफरचंदाला इतर फळांपासून वेगळ बनवतात.

सफरचंद जग भरात सगळ्यात जास्त खाल्ल जाणार फळ आहे.  सफरचंदामध्ये अँटी – ऑक्सिडंट्स, प्रथिने, कॅल्शिअम,पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-ए असे आपल्या शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात. आता आपण जाणून घेऊयात सफरचंद खाल्याने आपण कोण कोणत्या आजारापासून स्वताचा बचाव करू शकतो.

शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी आपल्या हृदयासाठी हानिकारक असते. सफरचंदापासून बनवलेले व्हिनेगर म्हणजेच अॅपल सायडर व्हिनेगर एक चमचा ग्लासभर कोमट पाण्यासोबत साधारणपणे 10 दिवस घेतल्याने आपल्या शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणायला मदत मिळते.

नियमित सफरचंद खाल्ल्याने आपल्याला श्वसनासंदर्भात असलेले आजार जसे कि दमा होण्याची शक्यता कमी होते. सकाळच्या नाश्त्यासोबत सफरचंद खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत रहायला मदत मिळते.

सफरचंदामध्ये फायबर घटक मोठ्याप्रमाणात असल्याने सफरचंद खाल्याने आपली पचनक्रिया चांगली होते. सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता आजाराचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

सफरचंद नेहमी सालीसह खाल्ले पाहिजे कारण सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-ए हा पोषक घटक असतो. जो आपली नजर चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त असतो.

सफरचंद खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शिअम, मॅग्नेशियम या पोषक घटकांमुळे आपली हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत मिळते. या सोबतच सफरचंद खाल्याने आपले दात चमकदार होतात.

सफरचंद खाल्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते. नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडतात. सफरचंदाचे सेवन रिकाम्यापोटी करू नका. रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्याने पोटात जळजळ, एसिडीटी, गॅस होण्याचा धोका असतो. इतर नाश्त्यानंतर सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असते.

आपल्याला “सफरचंद खाण्याचे फायदे” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपल्याला सफरचंद खाण्याने चांगला अनुभव आला असेल तर तो कमेन्टमध्ये सांगा. या व्यतिरिक्त सफरचंद खाल्याने अजून कोणते फायदे मिळतात हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *