- आरोग्य

हिवाळ्यात या 5 गोष्टी चेहऱ्यावर लावल्या तर त्वचा कोरडी आणि काळी पडू शकते

थंडीच्या दिवसात आपली त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. आपला चेहरा थंडीच्या दिवसात हि चांगला दिसण्यासाठी आपण चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो. मात्र आपला चेहरा कोरडा पडू नये यासाठी आपण खाली दिलेल्या गोष्टींचा वापर करत असाल तर त्यामुळे आपली त्वचा काळी पडू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्यावर काय लावू नये.

थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्याला साबण लावू नका. वातावरणातील गारव्यामुळे आणि हवेमुळे आपली त्वचा कोरडी पडलेली असते त्यावर आपण साबण लावला तर चेहरा अजून कोरडा पडतो. साबणाऐवजी आपण चेहरा साफ करताना कोरफडयुक्त फेसवॉशचा वापर करा.

थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्यावर स्क्रब लावणे टाळा. कारण हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी असते. नेहमी सारखी आपल्या त्वचेमध्ये आद्रता नसते. स्क्रब लावल्याने आपली त्वचा काळी पडू शकते. चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. काही वेळाने हलक्या हाताने आपला चेहरा चोळा असे केल्याने आपल्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाईल.

स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी बऱ्याचश्या स्त्रिया लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र हिवाळ्यात लिंबाच्या रसाचा वापर आपल्या त्वचेवर करू नका. कारण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असत ज्यामुळे आपली त्वचा अधिक कोरडी पडू शकते. आणि आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लोवर परिणाम होऊ शकतो.

थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्यावर फेस मास्क लावणे टाळा. कारण थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडलेली असते. फेस मास्क लावल्याने त्वचा ओढली जाऊ शकते.

इतर ऋतूपेक्षा हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो. पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असत. त्वचेचा पोत सुधरवायचा असेल तर पाणी पिणे गरजेच असत. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त पाणी प्यायल्याने आपला चेहरा तजेलदार राहायला मदत होते.

थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेला आद्रता देण्यासाठी आणि संरक्षणात्मक स्तर तयार करण्यासाठी आपण कोरफड जेलचा वापर करू शकता. आपल्याला “हिवाळ्यात आपल्या त्वचेसाठी कोणत्या गोष्टीचा वापर करू नये ” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

या व्यतिरिक्त हिवाळ्यात आपल्या त्वचेसाठी अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *