- आरोग्य

चेहऱ्यावरील काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. जर आपण उन्हात जास्त वेळ काम करत असाल, आपल्या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर असेल तर त्यामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक कमी होऊन आपला चेहरा निस्तेज आणि काळपट दिसायला लागतो. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने आपण आपली त्वचा परत पहिल्यासारखी करू शकाल.

आपल्या चेहऱ्याची त्वचा हि संवेदनशील असते. आपण जर उन्हात जास्त वेळ काम करत असाल तर सूर्यप्रकाशात असणाऱ्या अतिनील किरणामुळे आपली त्वचा काळसर दिसू लागते.

या पासून स्वताचा बचाव करण्यासाठी आपण उन्हात जाताना आपला चेहरा झाकून घेतला जाईल अशा पद्धतीचा स्कार्फ वापरा, दुपारच्या वेळी बाहेर पडत असाल तर आपण छत्रीचा देखील वापर करू शकता.

उन्हात बाहेर पडताना आपण चेहऱ्याला चांगली सनस्क्रीन देखील लावू शकता. चेहऱ्यावर वातावरणातील धूळ, गाड्यांमधून निघणारा धूर यामुळे काळसरपणा आला असल्यास तो घालवण्यासाठी दोन चमचे दुधाची मलई एका वाटीत घ्या त्यामध्ये थोडीशी साखर आणि ऑलिव ऑइल मिसळून मिल्की स्क्रब तयार करा.

त्यानंतर हलक्या हाताने ते आपल्या त्वचेवर लावा. आणि हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याची मसाज करा. 5 ते 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. काही वेळा हा उपाय केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी 2 चमचे मध घ्या त्यामध्ये 1 चमचा साखर मिसळून घ्या. त्यांनंतर हे मिश्रण हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावून मसाज करा. 10 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने आपल्या त्वचेवर जमा झालेली घाण, आणि मृत त्वचा निघून जाईल. आपली त्वचा परत पहिल्यासारखी सुंदर दिसू लागेल.

आपल्याला “चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या व्यतिरिक्त चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *