- आरोग्य

चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपला चेहरा सुंदर दिसावा अस प्रत्येकाला वाटत असत. आपण सुंदर दिसावं यासाठी आपण वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत असतो. आपल्यापैकी काही जणांची त्वचा कोरडी आणि काही जणांची त्वचा तेलकट असते.

तेलकट त्वचा असल्यावर आपल्या चेहऱ्यावर मेकअप टिकत नाही. आपल्या तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम सुद्धा येत असतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण कोरफड जेलचा वापर करू शकता. रात्री झोपण्याआधी आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन त्यावर हलक्या हाताने थोडेसे कोरफड जेल लावा.

सकाळी झोपेतून उठल्यावर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा उपाय नियमित केल्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होतील तसेच तेलकटपणा देखील कमी होईल.

कधी कधी आपला चेहरा चिकट होतो अश्या वेळी एका वाटीमध्ये 2 चमचे चण्याचे पीठ घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा आणि हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे राहू द्या नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. आपल्या चेहऱ्यावर चमक येईल आणि चिकटपणा देखील कमी होईल.

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण गुलाब जलचा वापर करू शकता. कापसाच्या बोळ्यावर थोडेसे गुलाबजल घेऊन ते आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. 30 मिनिटे तसेच राहुद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल. गुलाबजलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, अँटीमाइक्रोबियल असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.

तेलकट त्वचा असल्यास चेहरा साफ करण्यासाठी आपण कोमट पाण्याचाच वापर करा. कोमट पाण्याने आपला चेहरा चांगल्याप्रकारे साफ होतो. आपल्याला “चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

या व्यतिरिक्त चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *