- इन्फोमराठी

“NA प्लॉट” बिगरशेती भूखंड खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

आपले स्वताच हक्काच घर असाव अस प्रत्येकाला वाटत असत. घर बांधण्यासाठी बऱ्याचदा बिगरशेती भूखंड अर्थात NA प्लॉट खरेदी केला जातो. जमीन खरेदी करताना आपण कष्टाने कमावलेली मोठी रक्कम त्या जमिनीसाठी गुंतवत असतो.

म्हणूनच जमीन खरेदी करताना खरेदी केलेल्या जमिनीची कागदपत्रे आणि इतर गोष्टी पूर्णपणे तपासणी करूनच मग जमीन खरेदी करणे गरजेच असत. म्हणूनच आज आपण NA प्लॉट खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

मागील काही वर्षांपासून जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री केली जाताना आपल्याला दिसत. सर्वप्रथम आपण जो बिगरशेती भूखंड घेत आहात तो आपण ज्याच्याकडून घेत आहात त्याच्या नावावर आहे कि नाही हे तपासून घ्या.

यासाठी आपण त्या जमिनीचे जुने 7/12 उतारा आणि फेरफार नोंदी बघू शकता. सातबारा उताऱ्यावर त्या जमिनीच्या सर्व नोंदी असतात जर त्या जमिनीवर बॅंका अथवा वित्तीय संस्थांचे काही कर्ज असेल तर सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद असते.

त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्याच्या आधी त्या जमिनीचा 7/12 उतारा बघणे गरजेचे असते. त्यानंतर जमिनीचा फेरफार उताऱ्यामध्ये त्या जमिनीची वेळोवेळी झालेली खरेदी, गहाण व इतर व्यवहार तपासून घ्या.

बिगरशेती भूखंड घेत असताना त्या जमिनीचे सर्व शासकीय, निमशासकीय कर चालू तारखेपर्यंत भरले आहेत का? याची चौकशी करून घ्या. आपण खरेदी करत असलेल्या बिगरशेती भूखंडाची सरकारी मोजणी भूमी लेख कार्यालया मार्फत झाली आहे का हे तपासून त्याचा दाखला घ्या. आपण खरेदी करत असलेल्या बिगरशेती भूखंडाची जास्त खपाच्या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्या जमिन खरेदी बाबत कोणाची हरकत तर नाही ना हे तपासा.

आपण खरेदी करीत असलेल्या बिगरशेती भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर, वातावरण खरेदी करत असलेल्या भूखंडाच्या जवळून ओढा, नदी, नाला जात आहे का?  जास्त पाऊस झाला तर आपल्या भूखंडामध्ये पाणी साचेल का?, भूखंडाच्या आजूबाजूला कचरा डेपो, केमिकल कारखाना, उच्च दाबाची विद्युतवाहिनी जात आहे का? या सर्व गोष्टींची निरीक्षण करून माहिती मिळवा.

आपण खरेदी करीत असलेल्या बिगरशेती भूखंडाच्या आजूबाजूला शाळा, कॉलेज, बगीचा, रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत पुरवठा, कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे आहे हे याबाबतची माहिती मिळवा.

आपण खरेदी करीत असलेल्या बिगरशेती भूखंडाला नगर रचना किंवा महानगर पालिकेकडून मान्यता मिळू शकते का याची सुद्धा आपण चौकशी करू शकता. बिगरशेती भूखंड खरेदी करताना कायदेशीर सल्लागार, बांधकाम कॉन्ट्रॅक्टगर यांचा सल्ला घेऊन भूखंड खरेदी केल्यास घर बांधताना कायदेशीर व इतर अडचणी येत नाही.

महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडे बंदी हा कायदा लागू असल्याने नियमानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही. मात्र या ठिकाणी आपण हा उपाय आपण करू शकता.

यासाठी आपण घेत असलेल्या बिगर शेती भूखंडाचे ले-आऊट काढून त्या भूखंडाचे एक, दोन गुठ्यांचे प्लॉट पाडून जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी घेतली तर अशा मान्य ले-आऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते. या गोष्टीचा हि आपण विचार करणे या ठिकाणी महत्वाचे राहील.

आम्हाला आशा आहे कि बिगरशेती भूखंड खरेदी करताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला समजले असेल. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे या लेखामधून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *