- आरोग्य

चेहरा झटपट उजळण्यासाठी ‘उटण्याचा’ असा करा उपयोग

दिवाळी म्हटलं की अभ्यंग स्नान आले. पूर्वीपासूनच दिवाळीमध्ये उटणे लावण्याची परंपरा आहे. दिवाळी ही थंडीमध्ये असते. सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये लवकर उठून उटणे लावून दिवाळीच्या दिवसांमध्ये स्नान केले जाते. आपण वर्षभर हे अभंग स्नान केले नाही तरीही याचा फायदा वर्षभरासाठी होतो. उटणे हे एक प्रकारचे स्क्रबच आहे. आज आपपण उटणे लावल्यानंतर काय फायदे होतात हे पाहणार आहोत.

उटणे हे चांगल्या प्रकारचा स्क्रब असल्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास फायदा होतो. यातील बेसन आणि चंदन त्वचेवर साचलेली डेड स्किन कमी करण्यास मदत करते आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर थंडावा राहतो.

अभ्यंग स्नान केल्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या केसांची वाढ कमी होते. यासाठी अनेक स्त्रिया उटणे लावण्यास प्राधान्य देतात. उटण्याची पेस्ट गोलाकार दिशेने लावल्यास चेहऱ्यावरील केस निघून जातात. उटण्याने मसाज करताना काळजी घ्या. हळुवारपणे हाताने चेहऱ्यावर मसाज केल्यास चेहरा खुलून दिसतो.

चेहरा उजळण्यासाठी दोन छोटे चमचे बेसन पीठ घ्या  त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद मिसळा. त्यानंतर त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू रस आणि  थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. आणि हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धा तास लावून ठेवा व नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल.

उटणे लावल्यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते. यामध्ये वेखंड, चंदन, रक्तचंदन यांसारख्या औषधी वनस्पती असतात. हे चांगल्या प्रकारचे स्क्रब म्हणून काम करते. त्यामुळे नैसर्गिक चमक येते.

उटणे लावल्यामुळे सुरकुत्या येत नाहीत. वयानुसार त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. यामध्ये हळद असते. त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तजेलदार राहते. उटण्यामध्ये दूध घातल्यास याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे त्वचा मुलायम होते आणि त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते.

दिवाळीमध्ये थंडीचे दिवस असतात. त्यामुळे चेहरा आणि त्वचा कोरडी होते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. त्यामध्ये असलेल्या आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचा मुलायम होते. यामधील चंदन, हळद आपल्या त्वचेला मुलायम ठेवतात.

घरच्या घरी हे उटणे आपण बनवू शकता यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तयार आहे तुमचे घरगुती उटणे. या उटण्याचा वापर आपण चेहऱ्याला लावण्यासाठी करू शकता.

आपल्याला “चेहरा झटपट उजळण्यासाठी उटण्याचा वापर कसा केला पाहिजे” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या व्यतिरिक्त चेहरा झटपट उजळण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *