- आरोग्य

हिवाळा सुरू होण्यापूर्वीच टाचांना भेगा पडल्या असतील तर करा हे घरगुती उपाय

बघता बघता हिवाळा सुरु झालाय वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. हिवाळा हा ऋतू सगळ्यानाच आवडतो. हिवाळ्यात आपल्या त्वचेमधील ओलावा निघून जाऊन आपली त्वचा कोरडी, निस्तेज, सुरकुतलेली दिसते. आपल्या पायाच्या टाचांना भेगा पडतात.

टाचांना पडणाऱ्या भेगांकडे लवकर लक्ष न दिल्यास त्यामधून रक्त हि येत. यामुळे हिवाळ्याच्या थंडीचा आनंद घेण्याआधी आपल्या टाचांना भेगा पडू नये यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

टाचांना भेगा पडल्या असतील तर आपण त्यावर कोरफड जेल लावू शकता. रात्री झोपण्याआधी पाय कोमट पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर आपल्या टाचांना हाताने थोडेसे कोरफड जेल लावा. सकाळी अंघोळ करताना पाय धुऊन टाका. काही दिवस हा उपाय नियमित केल्याने आपल्या पायाच्या टाचा कोमल आणि मुलायम होतील.

टाचांना पडलेल्या भेगांवर आपण दही आणि मध लावू शकता.  दह्यामध्ये असलेल्या लॅक्टीक एसिडमुळे आपल्या टाचेवर असणारी मृत त्वचा निघून जाईल. आणि आपली टाच परत पहिल्यासारखी कोमल मुलायम होईल.

टाचेवर पडलेल्या भेगा घालवण्यासाठी एक चांगले पिकलेले केळे घ्या त्यातील गर एका वाटीत काढा आणि हाताने बारीक करा त्यानंतर तो गर आपल्या टाचांच्या भेगांवर लावा. साधारणपणे 15 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने पाय धुऊन टाका. मग त्यावर मॉइश्चरायझर लावा. रात्रभर तसेच राहूद्या. सकाळी गरम पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

टाचेवर पडलेल्या भेगा घालवण्यासाठी आपण त्या भेगावर पेट्रोलियम जेली सुद्धा लावू शकता. आपल्याला “टाचेवर पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय” ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

या व्यतिरिक्त टाचेवर पडलेल्या भेगा घालवण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *