- आरोग्य

तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

जेवल्यानंतर आपल्या दातांमध्ये अन्नाचे कण तसेच राहिल्याने तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. त्याचबरोबर पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास सुद्धा तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तोंडाला दुर्गध येत असल्यास कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो. तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी आपण जेवण केल्यानंतर बडीशेप खाऊ शकता. बडीशेप खाल्याने तोंडातील दुर्गंधी काही वेळातच दूर होते.

पुदिना खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असत. त्यामुळे रोज जेवल्यानंतर 2 ते 3 पुदिन्याची पाने चघळा. त्यामुळे मुख दुर्गंधी नाहीशी होईल आणि शरीराला अनेक पोषक घटक मिळतील. जेवण केल्यानंतर जेवणामध्ये कांदा, लसणाचा वापर असल्यास तोंडाला दुर्गंध येतो अशा वेळी तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी एखादी वेलची चघळा.

तोंडाला दुर्गंधी  येऊ नये यासाठी जास्त पाणी प्या. पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तोंडाला दुर्गध येऊ नये यासाठी आपण जेवण झाल्यावर 1 लवंग चघळा. लवंग खाल्याने तोंडाला येणारा घाण वास दूर होतो.

दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आपण बऱ्याच वेळा एखाद्या पदार्थाला सुगंध येण्यासाठी वापरतो. तोंडाला येणारा दुर्गंध  घालविण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनी चघळून खाल्याने मुख दुर्गंधी नाहीशी होईल. हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाला दुर्गंध येऊ नये यासाठी काही खाल्यानंतर चूळ भरा. सकाळ-संध्याकाळ ब्रश करा.

आपल्याला “तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय” या विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या व्यतिरिक्त तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो हे आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *