- आरोग्य

उलटी होणे, पित्त, मळमळ यावर घरगुती उपाय

मळमळ करणे, उलटी होणे, पित्त होणे, जळजळणे या सर्व सामान्य समस्या आहेत. बऱ्याचदा प्रवास केल्यामुळे मळमळ होते. पचनसंस्थेतील गडबड तसेच पित्त वाढल्यामुळे बऱ्याच जणांना मळमळ होते.

अचानक मळमळ व्हायला लागल्यास ती थांबवण्यासाठी हे काही घरगुती उपाय आपण करू शकता. ज्यांना उलटी होणे, पित्त, मळमळ हा त्रास कायम होतो त्यांनी सकाळी दोन ते तीन तुळशीची पाने चघळा असे केल्याने आपल्याला आराम मिळतो.

लिंबाच्या रसामुळे मळमळ कमी होते. तसेच जर तुम्ही लिंबाचा वास घेतला तर मळमळ तात्काळ थांबेल. लिंबाच्या रसामध्ये मध घालून हे मिश्रण घेतल्याने मळमळ थांबते. संत्र्याचा रस प्यायल्याने मळमळ कमी होते. वारंवार मळमळीचा त्रास होत असेल तर तुम्ही एक ग्लास संत्र्याचा रस रोज पिऊ शकता. त्यामुळे मळमळ थांबेल.

उलटी अथवा मळमळ होत असेल तर ही समस्या थांबवण्यासाठी बडीशेप खाऊ शकता. बडीशोप चावून खाल्लाने मळमळ थांबते. जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्याने पित्त कमी होते. हा सोपा घरगुती उपाय आपण करून बघू शकता. आल्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे मळमळ थांबते. जर तुम्ही आल्याचा रस अथवा आल्यापासून बनवलेला चहा घेतला तर मळमळ लगेच थांबेल.

मळमळ थांबवण्यासाठी साखर, मीठ आणि पाणी यांचे मिश्रण एकत्र करून हे पाणी केल्यास उलटी थांबते आणि मळमळीचा त्रास होत नाही. आपल्याला उलटी होणे, पित्त, मळमळ यावर घरगुती उपाय ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

उलटी होणे, पित्त, मळमळ यावर अजून काही घरगुती उपाय आपल्याला माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *