- आरोग्य

रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय

आज आपण एका महत्वाच्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत या आजाराचे नाव आहे डायबेटीज अर्थात मधुमेह; भारतामध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे आपण बातम्यामधून, वृत्तपत्रामधून माहित पडलच असेल डायबेटीस या आजारामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते.

डायबेटीस चे दोन प्रकार पडतात. टाइप 2 डायबेटीस असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या येतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय.

मधुमेहाशी लढा देण्यासाठी तुळशीची पाने प्रभावी आहेत आणि ती खाल्ल्यानेही आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आपल्याला मधुमेह असल्यास, तुळशीची पाने दररोज खा किंवा तुळशीच्या पानांचा रस प्या.

रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी महिनाभर रोज सकाळी एक ग्रॅम दालचिनी पावडर एक ग्लास गरम पाण्यासोबत प्या. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात मेथीचे दाणे टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि मेथी दाणे चावून खा.

याचे नियमित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. कोरफडमध्ये रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात. कोरफड ज्यूस पिण्यामुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी नियंत्रित राहते मधुमेह नियंत्रणात राहतो.

जांभूळ फळ मधुमेह रूग्णांसाठी चांगला उपाय आहे. एवढेच नाही तर जांभूळ फळव्यतिरिक्त त्याची पानेही मधुमेहासाठी प्रभावी मानली जातात. जांभळामध्ये उच्च पोटॅशियम आढळते, जे मधुमेहावर नियंत्रण ठेवते. म्हणून, आपण दररोज जांभळाची फळे किंवा त्याची पान खाऊ शकता.

दररोज सकाळी लसणाच्या दोन कळ्या खाव्यात आणि पाणी प्या. दररोज असे केल्याने आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रणात राहील. लसणामध्ये अयलिसिन नावाचा अँटीऑक्सिडंट आढळत, जे मधुमेह रोखण्यासाठी कार्य करतात.

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉलचे या अँटीऑक्सिडेंट प्रमाण जास्त असत. जे आपल्या रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे डायबेटीस रुग्णांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकत.

तुम्हाला मधुमेह असल्यास आठवड्यातून तीन दिवस कारल्याचा रस प्या. कारल्याचा रस प्यायल्याने शरीरात साखरेची पातळी कमी व्हायला मदत होते, आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. आपण घरी कारल्याचा रस सहज काढू शकता.

कडुलिंबाची चव खूप कडू असते आणि कडू गोष्टी मधुमेहाचा आजार दूर करण्यासाठी प्रभावी असतात. म्हणून आपल्याला डायबेटीजचा त्रास असल्यास आपण कडुलिंबाच्या पानांचे सेवन करु शकता. कडुलिंबाच्या पानांचा रस पिऊ शकता.

कढीपत्ता मधुमेह रुग्णांसाठीही फायदेशीर मानला जातो त्याची पाने खाल्ल्यास मधुमेह रुग्णांना फायदा होतो. म्हणूनच, आपण मधुमेह रोखण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. आपण दररोज 4-6 कढीपत्ता पाने खाऊ शकता किंवा अन्न शिजवताना आपण त्यात कढीपत्ता घालू शकता.

आपल्याला मधुमेह असल्यास, कोल्ड्रिंक्स, केक्स, पेस्ट्री, मिठाई, तांदूळ, पास्ता, ब्रेड, बर्गर यासारख्या गोष्टींचे सेवन करु नका. तसेच बटाटे किंवा स्टार्चयुक्त पदार्थ खाऊ नका. कारण स्टार्चच्या आत साखर जास्त प्रमाणात आढळते.

वरील लेखात आम्ही मधुमेह संपूर्णपणे बरा होऊ शकतो असतो असा कोणताही दावा करत नाही वरील उपायानी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे. आपल्याला रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *