- आरोग्य

हाडे मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय

निरोगी शरीरासाठी आणि कमी वयात संधिवातासारखा आजार जडू नये यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी आपण आपल्या आहारात आणि दिनचर्येमध्ये काय बदल केला पाहिजे.

हाडे आपल्या शरीराला आधार देण्याचे कार्य करतात. पूर्णवाढ झालेल्या माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात. हाडे मुख्यत कॅल्शियम या घटकापासून बनलेली असतात. वयाच्या तिशीनंतर कॅल्शियमयुक्त घटक असणाऱ्या गोष्टींचा आहारात कमी प्रमाणात समावेश केल्याने, पुरेसा शारिरीक व्यायाम न केल्याने आपली हाडे कमकुवत होतात.

हाडे कमकुवत असल्यावर सांधेदुखी, संधिवात, फॅक्चर होणे, अंग दुखणे अश्या गोष्टी सुरु होतात. म्हणूनच आजची माहिती खूप महत्वपूर्ण आहे. चला तर जाणून घेऊयात हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकत.

सर्वप्रथम आपल्या आहारात आपण दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम हा घटक असतो. त्यामुळे अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपली हाडे मजबूत होऊ शकतात.

हाडे मजबूत करण्यासाठी आपण आहारात काजू, बदाम, मनुके, अंजीर, अक्रोड अशा ड्रायफ्रुटचा देखील समावेश आपल्या आहारात करू शकता. ड्रायफ्रुटमध्ये पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी एसिड, कॅल्शियम आणि प्रोटिन हे घटक मुबलक प्रमाणात असतात.

हाडे मजबूत करण्यासाठी नारळ, सीताफळ, पेरू, आंबा, संत्री अशा कॅल्शियम घटक असणाऱ्या फळांचा आपल्या आहारात समावेश करू शकता. आहारात गुळ आणि शेंगदाण्याचा समावेश केल्याने देखील आपली हाडे मजबूत होतात.

हाडे मजबूत होण्यासाठी आहाराबरोबरच आपण शारीरिक व्यायाम देखील करणे खूप गरजेचे असते. नियमितपणे सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात चालल्याने किंवा धावल्याने आपल्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटामिन डी आपल्याला त्यातून मिळेल. व्हिटामिन डी हाडांच्या मजबुतीसाठी महत्वाचे असते.

एक कप कॉफी प्यायल्याने साधारणपणे शरीरातील 150 मिलीग्राम कॅल्शियम लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. म्हणून शक्य तितके कॉफी पिणे टाळा. आपल्याला हाडे मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणती माहिती आपल्याला वाचायला आवडेल हे पण नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *