- आरोग्य

चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे

निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि दैनंदिन व्यायाम करणे आवश्यक असत हे आपल्याला माहित असेल म्हणून आपण थोडा तरी दैनंदिन व्यायाम करत असाल आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आम्ही नियमित आपल्यालासाठी आपल्या आरोग्यासाठी महत्वाची माहिती आणत असतो. आज आपण ज्या फळाविषयी जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे.

चिकू हे फळ चवीला मधुर आणि आपली पाचनशक्ती मजबूत करणारे असते. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई,  व्हिटॅमिन सी,  अँटिऑक्सिडंट्स, फायबर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह असे पोषक घटक असतात.

चिकूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असे पोषक घटक असल्याने हाडे मजबूत बनवायची असतील तर आजपासूनच चिकू खाण्यास सुरुवात करा. चिकूमध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे आपली पाचनशक्ती चांगली होते. म्हणून ज्यांना बद्धकोष्ठता सारखा आजार असेल त्यांनी आहारात चिकूचा समावेश अवश्य करावा.

दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आपल्या आहारात चिकूचा समावेश केला पाहिजे कारण चिकूमध्ये  ग्लूकोज हा घटक असतो जो लगेच उर्जा देण्याचे काम करतो. आहारात चिकूचा समावेश केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि विष्टेतून बाहेर पडतात.

आहारात नियमित चिकूचा समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. मन शांत ठेवण्यासाठी चिकू खा तुम्हाला फरक जाणवेल. आपल्याला चिकू खाण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *