- आरोग्य

अक्कल दाढ दुखत असल्यास करा हे घरगुती उपाय

अक्कलदाढ वयाच्या 17 ते 27 वयादरम्यान येत असतात. ह्या वयात आपल्या जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. ज्यामुळे अक्कल दाढेला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. यामुळेच अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना होऊ शकतात.

काही वेळेस ह्या वेदना इतक्या तीव्र असतात पार कानापर्यंत हि जाऊ शकतात. अर्धवट वर आलेल्या अक्कल दाढांमध्ये अन्नाचे कण किंवा इतर पदार्थ अडकल्यामुळे त्या भागात सूज येण्याची शक्यता असते.

काही वेळा ही सूज घसा आणि मानेपर्यंतही जाऊ शकते म्हणूनच आज आपण अक्कल दाढ दुखत असल्यास कोण कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याची माहिती घेणार आहोत.

अक्कल दाढ येत असताना हिरड्यांमध्ये वेदना होत असल्यास त्या भागावर बर्फ लावल्यामुळे वेदना कमी होण्यास मदत मिळते. यासाठी बर्फाचे छोटे तुकडे 10 मिनिटे दातांजवळ ठेवा. असे केल्याने  वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल.

अक्कल दाढ येत असताना हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर कपभर कोमट पाण्यात चमचाभर मीठ टाकून त्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने वेदना कमी होतील.

अक्कल दाढ येत असताना वेदना होत असल्यास एक लसणाची पाकळी ठेचून त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने वेदना कमी होऊन आराम मिळेल. अक्कल दाढ येत असताना वेदना होत असल्यास त्यावर पेरूच्या पानांचा वापर केल्यास आराम मिळेल. पेरूच्या पानांच्या रसामुळे तुमचे अक्कल दाढ दुखणे कमी होऊ शकते.

अक्कल दाढ येत असताना वेदना होत असल्यास लवंग चघळा. लवंगा चघळल्याने अथवा दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील. अक्कल दाढ येत असताना वेदना होत असल्यास कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवून चावा. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

पुदिन्याची पानं अक्कल दाढदुखीला कमी करण्यासाठी आपण वापरू शकता. कारण पुदिन्याची पाने आणि पुदिना तेलामध्ये दाह कमी करण्याचे आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात.

अक्कल दाढ येत असताना वेदना जाणवू नये यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने आपल्या तोंडाची  स्वच्छता राखली जाते. आणि शरीरातील टॉक्सिन्स पाण्यावाटे बाहेर टाकले जातात.

आपल्याला अक्कल दाढ दुखत असल्यास कोण कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *