- आरोग्य

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आम्ही नियमित आपल्या आरोग्यासाठी महत्वाची माहिती आणत असतो. आज आपण हिवाळ्यात बाजारात उपलब्ध होण्याऱ्या स्ट्रॉबेरी ह्या फळाबद्दल जाणून घेणार आहोत.  थंडी सुरु झाली कि बाजारात स्ट्रॉबेरी उपलब्ध होते. लाल चुटूक स्ट्रॉबेरीची चव आंबट गोड असते.

स्ट्रॉबेरी रसदार आणि उत्साहवर्धक असते. स्ट्रॉबेरीमध्ये एंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटामिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी9, व्हिटॅमिन के,  पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉलीक एसीड असे पोषक घटक असतात. स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात एंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटामिन सी असल्याने स्ट्रॉबेरी खाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली होते.

आपली त्वचा हिवाळ्यात चांगली राहावी यासाठी आपण स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता यासोबतच स्ट्रॉबेरीचा गर काढून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. असे केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होईल. स्ट्रॉबेरी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला मदत मिळते.

स्ट्रॉबेरीमध्ये असणारे फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला खराब कोलेस्टेरॉल वाढण्यापासून वाचवतात, नियमित स्ट्रॉबेरी खाल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका कमी होतो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. स्ट्रॉबेरी खाल्याने आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढत नाही.

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले एन्झाइम्स दृष्टी वाढवण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट घटक आपल्याला डोळ्यांना होणाऱ्या मोतीबिंदू आजारापासून वाचवण्याचे कार्य करतात.

नियमित स्ट्रॉबेरी खाल्याने स्ट्रॉबेरीमध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन आणि गॅससारख्या समस्या आपल्याला होत नाही.

आपल्याला स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *