- आरोग्य

हिवाळ्यात सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत 2 चमचे आवळा ज्यूस प्यायल्याने मिळणारे फायदे

आवळ्याच्या औषधी गुणधर्माबद्दल आपल्या पूर्वजांना माहित होत. आपण हि त्यांच्या तोंडून अनेक वेळा आवळ्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी ऐकल असेल. आवळा आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

आवळ्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्याचे कार्य करतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत 2 चमचे आवळा ज्यूस प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, कॉपर, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम असे पोषक घटक असतात.

नियमित सकाळी रिकाम्यापोटी 1 ग्लास गरम पाण्यासोबत 2 चमचे आवळा ज्यूस प्यायल्याने आवळ्याच्या रसामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्समुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल; आपल्याला सर्दी खोकला असे आजार होण्याचा धोका कमी होईल तसेच आपला घसा दुखत असेल तर आराम मिळेल याचबरोबर आपले केस मजबूत आणि चमकदार होतील.

आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असतील तर ते कमी होतील; त्वचा चमकदार आणि मऊ होईल. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणार नाही. नजर तीक्ष्ण होईल. आपण जर वजन कमी करत असाल तर सकाळी रिकाम्यापोटी 1 ग्लास गरम पाण्यासोबत 2 चमचे आवळा ज्यूस प्या असे केल्याने आपला चयापचय दर वाढेल; शरीरात अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि वजन कमी होईल.

आवळ्याच्या रसामध्ये कॅल्शियम हे पोषक तत्व असल्याने आवळ्याचा रस प्यायल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. आवळ्याच्या रस आपल्या शरीराला आतून डिटॉक्स करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

आपल्याला सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत 2 चमचे आवळा ज्यूस प्यायल्याने मिळणारे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *