ओठ जीभ, टाळू यांच्या वरती छोटे छोटे फोड आल्यास त्याला आपण तोंड आले असे म्हणतो. यामध्ये जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होत यामुळे आपल्या काही खाता येतं नाही. अपुरी झोप घेणे, अती तिखट पदार्थ खाणे, अती गोड पदार्थांच्या सेवनाने, शरीरात विटामिन बी चे संतुलन नसल्यास जीभ आणि तोंडाला आतून फोड येतात. आज आपण या समस्येवरील घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.
तोंडाला आतून फोड आले असतील तर जेष्ठ मधाची कांडी चघळावी यामुळे लवकर आराम मिळेल. तोंडाला आतून फोड आले असतील तर ताक प्या. ताक प्यायल्याने वेदना कमी होतील. आणि फोड लवकर बरे होतील.
तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. यासाठी जाईची ५ – ६ पाने स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. असे दिवसातून ३ – ४ वेळा, या प्रमाणे ४ – ५ दिवस करायला सांगावे. एक केळी गाईच्या दुधाबरोबर खा तोंडाला आतून आलेले फोड बरे होण्यास मदत होईल.
तोंड आल्यावर खोबरे चावून चावून खाल्याने वेदना कमी होतात. आणि तोंडाला आतून झालेल्या जखमा लवकर भरून येतात. तोंड आल्यावर नारळाचे पाणी प्यायल्याने ही आराम मिळतो.
तोंड आल्यावर तोंडली ची भाजी किंवा कच्चे तोंडली खाल्यास आराम मिळतो. तोंड आल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. आणि या पाण्याने गुळणा करा म्हणजे तोंडाच्या प्रत्येक भागामध्ये थोडावेळ फिरवा.
यामुळे ज्वलन आणि वेदना होईल, परंतु काही दिवसांत फोड पूर्णपणे अदृश्य होतील. मिठामध्ये सोडियम क्लोराईड ज्याच्यामुळे जखमेवरील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मदत मिळते.
तोंड आल्यावर वेदना होत असल्यास तुरटीच्या पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होतात. तोंड आल्यावर तुळशीची दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. काही दिवसांत फोड पूर्णपणे अदृश्य होतील.
तोंड आल्यावर आपण ओल्या नारळाच्या दुधाने दिवसातून 4 ते 5 वेळा गुळण्या करा. नारळाच्या दुधाने गुळण्या केल्याने जखम लवकर बरी होण्यास मदत मिळेल. तोंड आल्यावर धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. या पाण्याने गुळण्या केल्याने लवकर आराम मिळतो.
तोंडाला आतल्या बाजूने फोड आले असल्यास लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. तोंड आल्यावर त्या जागी कोवळ्या पेरूच्या पानांचा रस लावल्यास आराम मिळेल.
तोंडाला आलेले फोड बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून रस काढून तोंडाला आतल्या बाजूने लावा. काही दिवसांत फोड पूर्णपणे निघून जातील. तोंडाला आतून फोड आल्यास त्या जागेवर थोडे मध लावा. मध लावल्याने फोड बरे होण्यास मदत होईल.
सारखे सारखे तोंड येत असेल तर पुढीलप्रमाणे काळजी घ्या. आपल्या आहारात मसालेदार आणि तेलकट पदार्थ असतील तर ते पदार्थ खाणे टाळा. रात्री पुरेशी झोप घ्या. दिवसभरात पुरेसे पाणी प्या. आहारात पालेभाज्या असल्या, की बहुधा हा आजार होत नाही. त्यामुळे जेवणात पुरेश्या पालेभाज्यांचा समावेश करा.
आपल्याला जीभ आणि तोंडाला आतून येणाऱ्या फोडांवर साधे अन सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.