- आरोग्य

दररोज 1 ते 2 अंजीर दुधात भिजवून खाल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

आज आपण अंजीर ह्या फळाबद्दल जाणून घेऊयात अंजीर हे फळ ताजे आणि सुकवून अश्या दोन्ही प्रकारे खाल्ल जात. सुकवलेल्या अंजीरामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, प्रथिने, कैल्शियम, आयरन, मैग्नीशियम, पोटैशियम, जिंक, फॉस्फरस, कॉपर असे बरेचशे पोषक घटक असतात.

दुधामध्ये भिजवलेले अंजीर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असत. दुधात अंजीर भिजवल्याने ते पचायला हलके होते तसेच त्यापासून आपल्याला जास्त फायदे मिळू शकतात.  यासाठी 1 ते 2 अंजीर रात्रभर दुधात भिजायला ठेवून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करायचे असते.

सकाळी रिकाम्यापोटी दुधात भिजवलेले अंजीर खाल्याने अंजीरमध्ये असणाऱ्या कैल्शियम, आणि मैग्नीशियम या पोषक घटकांमुळे आपली हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत मिळेल.

दुधात भिजवलेले अंजीर खाल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल; अंजीर हे रक्तवर्धक आणि रक्तशुद्धीकारक असत. नियमित दुधात भिजवलेले अंजीर खाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारेल. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर घटक असतात. अंजीराचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता ह्या आजारावर मात करता येते.

नियमितपणे अंजीराचे सेवन केल्यामुळे कोलॅजनचे प्रमाण योग्य राहायला मदत मिळते. त्यामुळे त्वचा दिवसेंदिवस अधिक चांगली दिसू लागते. आपल्या त्वचेवर अकाली सुरकुत्या येत नाही.

अंजीर हे पचायला थोड जड असल्याने त्याचे सेवन प्रमाणात करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे; तसेच डायबेटीसचा त्रास असल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंजीराचे सेवन करणे आपल्यासाठी चांगले राहील.

आपल्याला अंजीर दुधात भिजवून खाल्याने मिळणारे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *