- आरोग्य

“दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी’’ प्रभावी उपाय

पुरुषांचा चेहरा दाट आणि सुंदर दाढी मिशा असल्यावर अजून खुलून दिसतो. रुबाबदार दाढी मिशा पुरुषांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालण्याचे काम करतात. चेहऱ्यावर कमी अधिक प्रमाणात दाढी मिशा येणे हे जरी अनुवांशिक असल तरी या काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण आपली दाढी आणि मिशा दाट करू शकता.

आपल्या चेहऱ्यावरील दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी आपण हा सोपा उपाय नक्की करून बघू शकता यासाठी एका वाटीमध्ये शुध्द आवळ्याचे तेल 2 चमचे घ्या त्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मोहरीचे तेल मिसळा.

रात्री झोपण्याआधी आपला चेहरा पाण्याने धुऊन ह्या दोन्ही तेलाचे मिश्रण हलक्या हाताने आपल्या दाढीवर चोळा. रात्रभर राहूद्या सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय 45 दिवस केल्याने आपल्या फरक दिसू लागेल.

चेहऱ्यावरील दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी 100 मिली शुद्ध नारळाच्या तेलामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने छोटे छोटे तुकडे करून टाका आणि उकळून गाळून घ्या. त्यानंतर हे तेल थंड झाल्यावर रात्री झोपण्याआधी आपल्या दाढी आणि मिशावर हलक्या हाताने लावा.

सकाळी कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्याला फरक दिसून येईल. चांगल्या परिणामासाठी आपण यामध्ये थोडासा पांढऱ्या कांद्याचा रस देखील मिसळू शकता.

वरती दिलेले उपाय करताना एक काळजी घ्या. हि दोन्ही तेल दाढी दाट करण्यासाठी प्रभावी आहेत तरी सुद्धा पहिल्यांदा हा उपाय करताना सर्व दाढी आणि मिशांवर तेल न लावता थोड्याश्या भागावर लावा. आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसून आला तर मग संपूर्ण दाढी आणि मिशांवर लावा.

दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी ह्या काही महत्वाच्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी कमीत कमी 45 ते 60 दिवस दाढी आणि मिशांचे केस कापू नका. असे केल्याने दाढी दाट व्हायला मदत मिळते.

आपला आहार हा सकस असायला हवा त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे. प्रथिने आपल्या शरीराला पोष्टिक घटक पुरवण्याच काम करतात. आणि यामुळे आपल्या केसांची वाढ जलद होते. याचबरोबर दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

आणि केस चांगले वाढण्यासाठी शक्य तितके तणाव मुक्त राहायचा प्रयत्न करा. आपल्या आहारात विटामिन बी1, विटामिन बी6, विटामिन बी12 मिळेल अशा पदार्थांचा समावेश असुद्या. या सोबतच दाढी मिशा दाट करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बायोटीनची गोळी घेऊ शकता.

आपल्याला “दाढी आणि मिशा दाट करण्यासाठी’’ प्रभावी उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *