- आरोग्य

किडनी खराब असण्याची लक्षणे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव म्हणून आम्ही नियमितपणे आपल्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती घेऊन येत असतो. आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्या विषयीच्या बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे जो रक्ताची स्वच्छता करतो आणि मूत्रमार्गातून शरीरात साठवलेल्या यूरिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक हानिकारक पदार्थांना काढून टाकण्याच कार्य करतो.

किडनी रक्ताच्या अशुध्द भागाला मूत्राच्या रुपातून बाहेर काढण्याचे कार्य करत असते. किडनीचे रोग सुरुवातीला समजत नाही परंतु हे हानिकारक असतात. आज आपण जाणुन घेणार आहोत किडनी खराब होण्याआधी शरीर कोणते इशारे देते

कमी किंवा जास्त लघवीला येणे हे किडनीच्या आजाराचे सर्वात पहिले लक्षण आहे. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत कमी किंवा जास्त लघवीला येते. जर आपल्याला लघवी करत असताना जळजळ होत असेल तर समजून घ्या की आपल्याला मूत्रमार्गात संसर्ग किंवा मूत्रपिंडाचा त्रास असू शकतो.

जर आपल्याला उच्च रक्तदाबा बरोबरच मधुमेह देखील असेल तर उच्च रक्तदाबामुळे किडनीजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमकूवत होतात. त्यामुळे किडनीला कार्य कारणासाठी पुरेशा रक्ताचा पुरवठा होत नाही.

किडनी शरीरातून जास्तीचे पाणी आणि मीठ काढण्याचे कार्य करते. योग्यप्रकारे कार्य न केल्याने शरीरातील पाणी वाढते, ज्यामुळे संपूर्ण शरीर सुजु लागते. पाय, चेहरा यांच्या चारही बाजूला विशेषतः सकाळी सूज येते. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

जर आपल्या डोळ्यांखाली सूज येत असेल तर ते किडनीच्या खराब असण्याचे लक्षण देखील असू शकते. किडनीच्या निकामी असेल तर  शरीरातून पाणी बाहेर पडू शकत नाही आणि शरीरात पाणी भरल्यामुळे पायात सूज येणे सुरू होते.

रक्तात अशुध्द पदार्थ राहिल्यामुळे मळमळ आणि उलटी येण्याची शक्यता असते. जर आपल्यास पोटातील डाव्या किंवा उजव्या बाजूला असह्य वेदना होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे, वजन कमी होणे आणि झोप कमी होणे ही सुद्धा किडनीच्या आजारांची लक्षणे आहेत. किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात विषारी घटक पदार्थ जमा झाल्यामुळे आपल्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात, अंगाला खाज सुटू शकते.

लघवी करताना रक्त येत असेल तर लगेच सावध व्हा. हे किडनीच्या निकामी होण्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत आपण त्वरित एखाद्या यूरोलॉजिस्टला भेटले पाहिजे.

आपल्याला किडनी खराब असण्याची लक्षणे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *