- आरोग्य

फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय

बदललेली जीवनशैली आणि वाढत्या प्रदुषणामुळे आपल्याला आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. आजकाल कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्यांना सामोरे जाव लागत आहे. याशिवाय आपल्यापैकी काही जणांना म’द्यपान, धु’म्रपान करायची सवय असू शकते.

ह्या सवयीमुळे त्यांची फुफ्फुस लवकर खराब होण्याची शक्यता असते. वातावरणातील प्रदुषणामुळे सुद्धा आपली फुफ्फुस लवकर खराब होऊ शकतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी, खोकला घसादुखीचा त्रास कमी होण्यासाठी आपण बऱ्याचदा आल्याचा चहा पित असतो. दररोज 1 कप आल्याचा कोरा चहा प्यायल्याने फुफ्फुसे निरोगी आणि स्वच्छ व्हायला मदत मिळते.

आले आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करत. आल्यामध्ये असणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि बीटा-कॅरोटीन हे घटक आपले फुफ्फुस निरोगी ठेवायला मदत करतात.

फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ बाहेर काढण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा दालचिनीचा काढा घेऊ शकता. दालचिनीचा काढा कसा बनवतात हे समजून घेऊयात यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनीचा छोटा तुकडा टाकून ते पाणी उकळा. पाणी अर्धे झाले की गाळून घ्या आणि थोडेसे कोमट असतानाच प्या. हा काढा प्यायल्याने फुफ्फुसे निरोगी आणि स्वच्छ व्हायला मदत मिळते.

आपले फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी प्राणायाम करा. प्राणायाम केल्याने श्वासासंबंधीच्या समस्या दूर होतात; आणि आपले फुफ्फुस देखील सुरळीतपणे काम करू लागत.

फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी आपण आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. गरम पाण्याची वाफ घेतल्याने आपला घसा मोकळा होतो श्वसनासंबंधीचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

आपल्याला “फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या पैकी कोणता उपाय आपण या आधी केला असेल तर आपला कमेन्ट करून अनुभव सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *