- आरोग्य

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

आपला चेहरा सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने, हार्मोनल बदलामुळे, वाढत्या वयामुळे, प्रदूषणामुळे या काही कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येतात. जितक्या लवकर हे डाग आपल्या चेहऱ्यावर येतात तेवढ्या लवकर ते आपल्या चेहऱ्यावरून जात मात्र नाही.

हे डाग जाण्यासाठी मग वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम्स आपण चेहऱ्यावर लावतो अथवा जादा मेकअप करून हे डाग लपवण्याचा प्रयत्न करतो. केमिकलयुक्त क्रीम्स आपल्या चेहऱ्यावर लावल्याने आपल्या चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहचून चेहरा लालसर दिसू लागतो.

चेहऱ्यावर खाज येऊ लागते, पिंपल्स येतात म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून आपण चेहऱ्यावरील डाग घरातल्या घरात सहजरीत्या घालवू शकता.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी एका वाटीत पिकलेल्या पपईचे काही तुकडे घ्या. हाताने ह्या तुकड्यांचा लगदा तयार करा. लगदा तयार झाल्यावर तो हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. हा उपाय 21 केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील. चेहऱ्यावर चमक येईल. चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर निघून जाईल.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आपण आपली त्वचा संवेदनशील (सेन्सेटीव) नसेल तर हा उपाय करू शकता; यासाठी एका वाटीत 2 चमचे लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा हळद पावडर मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी लावा. 15 ते 20 मिनिट राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या फरक दिसून येईल.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी चंदनाचा उपयोग अनेक वर्षापासून केला जातो. चंदन गुलाबपाणी अथवा दुधात मिक्स करून याचा लेप चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास ते डाग लवकर कमी होतात आणि त्वचा देखील उजळ दिसू लागते.

चेहऱ्यावर काळे डाग पडू नये यासाठी आपण ज्यावेळी उन्हात जाणार असाल तेव्हा सनस्क्रीनचा वापर करा, चेहरा स्कार्फने झाका, छत्रीचा वापर करा, आपल्या आहारात फळे, भाजीपाला यांचा समावेश असू द्या, पुरेसे पाणी पित जा.

आपल्याला “चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी घरगुती उपाय” ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या पैकी कोणता उपाय आपण या आधी केला असेल तर आपला चांगला अनुभव कमेन्ट करून सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *