- आरोग्य

वजन कमी करण्यासाठी, त्वचा आणि हृदयासाठी ग्रीन टीचे फायदे, ग्रीन टी कसा बनवायचा?

आजकाल आपण बघतोय बरेच लोक आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत. आपल्याला ह्या 2 वर्षात एक गोष्ट चांगली कळली आहे ती म्हणजे निरोगी राहायचं असेल तर आपण आरोग्याची काळजी घेण खूप गरजेच आहे.

बरेच दिवस घरी बसून काम करण्याच्या सवयीमुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण ग्रीन टी पिवू शकता. वाढलेलं वजन कमी करण्याव्यतिरिक्त ग्रीन टी पिण्याचे अजून कोणकोणते फायदे मिळू शकतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जपान या देशामध्ये ग्रीन टी हे सगळ्यात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. जपानी लोक जगात सगळ्यात जास्त जगतात याच एक कारण ग्रीन टी हे आहे.  ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल घटक, पोटेशियम, जिंक, कॉपर, राइबोफ्लेविन, नियासिन, विटामिन बी6, कैफीन असे घटक असतात.

रात्री झोपण्याच्या 30 मिनिटे आधी एक कप ग्रीन टी प्यायले तर आपल्याला चांगली झोप येऊ शकते. ग्रीन टी मध्ये असणारे थेनिन नावाचे कम्पाउंड आपल्या झोपेला उत्तेजना द्यायचे आणि मज्जातंतूंना शांत करण्याचे काम करते.

मज्जातंतू शांत झाल्यावर तणाव कमी होऊन चांगली झोप लागते. नियमित रात्री झोपण्याच्याआधी एक कप ग्रीन टी प्यायल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो.

ग्रीन टी प्यायल्याने आपला चयापचय दर (मेटाबॉलीजम) वाढायला मदत मिळते. अन्नपचन व्यवस्थित झाल्याने पोट व्यवस्थित साफ होते. शरीर आतून डिटॉक्स होते. शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.

कोलेस्ट्रोल पातळी संतुलित राहते. पोट साफ असल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही.  ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रोल पातळी संतुलित राहायला मदत मिळते परिणामी आपले हृदय निरोगी राहते.

ग्रीन टी बनवायला अगदी सोपा असतो यासाठी एक कपभर पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये थोडीशी ग्रीन टीची पाने हाताने तोडून टाका. उकळ्यानंतर याचा रंग हिरवट पोपटी होतो. मग गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.

आपल्याला या चहाची चव आवडत नसेल तर आपण या चहाची सवय होत नाही तो पर्यंत त्यामध्ये थोडसे मध टाकू शकता. जर आपल्या इथे ग्रीन टीची पाने उपलब्ध नसेल तर आपण बाजारात मिळणाऱ्या ग्रीन टी पावडरचा देखील वापर करू शकता.

चहा बनवायची पद्धत थोडीशी बदलेल कपभर गरम पाण्यात थोडीशी ग्रीन टी टाका चमच्याने हलवून घ्या, आपली ग्रीन टी तयार झाली. आता तिचा आस्वाद घ्या. आपण हि चांगली सवय स्वताला लावल्यानंतर काय बदल झाला आम्हाला मेसेज करून नक्की कळवा.

आपण जर आधीपासून ग्रीन टी पित असाल तर आपल्याला त्याचे कोणकोणते फायदे जाणवले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

माहिती कशी वाटली हे नक्की सांगा काही बदल सुचवायचे असतील तर मेसेज करा. अथवा इमेल करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *